Nashik Ranji Update : पहिल्या दिवशी महाराष्ट्र ७ बाद २५८
दैनिक भ्रमर
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी):- नाशिकच्या अनंत कान्हेरे मैदानावर सुरू झालेल्या रणजी करंडक साखळी सामन्याच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्राने ७ बाद २५८ धावा केल्या.
यात अर्धशतकवीर सौरभ नवले आणि नाशिकचा अष्टपैलू खेळाडू रामकृष्ण घोष यांच्या सहाव्या विकेटसाठी केलेल्या ६८ धावांच्या भागीदारीमुळे महाराष्ट्राच्या धावसंख्येला बर्यापैकी आकार प्राप्त झाला. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा नवले ८ चौकारांसह ६० धावांवर तर गुरूबानी हा २२ धावांवर नाबाद होता.