विराटने आज
विराटने आज "हा" विक्रम केला आपल्या नावावर
img
दैनिक भ्रमर
मास्तर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा एक रेकॉर्ड आज विराट कोहलीने मोडला आहे. 

विराटने पाकिस्तानविरुद्ध 14 धावा पूर्ण करताच सचिनला मागे टाकलं आहे. विराट कोहली वनडे क्रिकेटमध्ये वेगवान 14 हजार धावा पूर्ण करणारा पहिला फंलदाज ठरला. विराटने सचिनच्या तुलनेत 63 डावांआधी ही कामगिरी केली आहे.

वनडे क्रिकेटमध्ये 14 हजार धावा पूर्ण करणारा विराट तिसरा आणि टीम इंडियाचा दुसरा फलंदाज ठरला आहे. विराटने पाकिस्तानविरुद्ध 13 व्या ओव्हरमधील तिसऱ्या चेंडूवर एक धाव घेत 14 धावांचा टप्पा पूर्ण केला.

विराटने 299 सामन्यांमधील 287 व्या डावात ही कामगिरी करुन केली आहे. सचिनने 350 डावात 14 हजार धावा पूर्ण केल्या होत्या.

इतर बातम्या
Join Whatsapp Group