जगातील असा एक क्रिकेटपटू ज्याचा नोटांवर आहे फोटो, तुम्हांला माहिती आहे का 'हा' खेळाडू ?
जगातील असा एक क्रिकेटपटू ज्याचा नोटांवर आहे फोटो, तुम्हांला माहिती आहे का 'हा' खेळाडू ?
img
वैष्णवी सांगळे
जवळपास सर्वच देशातील चलनी नोटांवर तेथील राष्ट्रपुरुषांचे, महापुरुषांचे, पंतप्रधान वा राष्ट्रपतींचे किंवा राजाचे किंवा देवतांचे फोटो छापलेले असतात. पण असा एक देश आहे ज्या देशाच्या नोटेवर चक्क क्रिकेटपटूचा फोटो आहे. यावरून हा क्रिकेटपटू किती महान असेल आणि या देशातील जनता त्याच्यावर किती प्रेम करत असेल हे स्पष्ट होतं.

या क्रिकेटपटूचं नाव आहे फ्रँक वॉरेल. वेस्ट इंडीज संघाचा माजी कर्णधार. खरंतर वेस्ट इंडीजची टीम एका देशाची नसून द्वीपीय देशांच्या समूहाची टीम आहे. त्यातच बारबाडोस हे एक आहे. महान ऑलराऊंडर गॅरी सोबर्स सुद्धा हे बारबाडोसचे आहेत. फ्रँक वॉरेल यांच्या क्रिकेटमधील योगदानावर सेंट्रल बँक ऑफ बारबाडोस बेहद फिदा आहे. त्यामुळेच बँकेने नोटावर फ्रँक वॉरेल यांचा फोटो छापला आहे. 

विशेष म्हणजे हा महान क्रिकेटपटू अधिक काळ जगला नाही. वॉरेल यांचं वयाच्या ४२व्या वर्षीच निधन झालं. वॉरेल हे अत्यंत जबरदस्त खेळाडू होते. माणूस म्हणूनही ते महान होते. विरोधी टीमसोबतच्या खेळाडूंसोबतचे त्यांचे संबंध अत्यंत चांगले होते. वॉरेल यांच्यासोबत क्रिकेट खेळलेले असंख्य क्रिकेटर आजही त्यांच्या स्वभावाचं कौतुक करतात. वॉरेल यांचा तर भारतीय टीममधील एका खेळाडूशी तर रक्ताचं नातंही आहे. म्हणजे त्यांनी भारतीय संघाचे माजी कर्णधार नरी कॉन्ट्रॅक्टर यांना रक्त दिलं होतं. १९६२ मधील ही गोष्ट आहे. तेव्हा वॉरेल हे भारताच्या दौऱ्यावर आले होते.
इतर बातम्या
Join Whatsapp Group