टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहली याने घेतलेल्या एका निर्णयाने क्रिकेट चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. विराट ऑस्ट्रेलियात पोहचणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार विराट कोहली रविवारी 10 नोव्हेंबरला संध्याकाळी ऑस्ट्रेलियात दाखल झाला. टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर गावसकर ट्रॉफीच्या इतिहासात पहिल्यांदा 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहेत. या मालिकेला 22 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. हा सामना पर्थ येथे होणार आहे.
टीम इंडियाचे खेळाडू 2 तुकडीत ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे. भारताची पहिली तुकडी ऑस्ट्रेलियासाठी रवाना झाली आहे. मात्र त्याआधीच विराट तिथे पोहचला आहे. विराट शनिवारी मुंबई विमानतळावर दिसला होता. विराट त्याची पत्नी अनुष्का आणि दोन्ही मुलं हे एअरपोर्टवर स्पॉट झाले होते. याचाच अर्थ विराट शनिवारी ऑस्ट्रेलियासाठी रवाना झाला होता.
न्यूझीलंडने भारताला मायदेशात व्हाईटवॉशने पराभूत केलं. न्यूझीलंडने ती मालिका 3-0 ने जिंकली. विराटला अनुभवी फलंदाज या नात्याने काही खास करता आलं नाही. विराटला धावांसाठी त्या मालिकेत संघर्ष करावा लागला. विराटला यांची खंत आहे. त्यामुळे आता विराट कमबॅक करण्यासाठी सज्ज आहे. त्यामुळे आता विराट पहिल्या सामन्याआधी जोरदार सराव करुन मैदानात कांगारुंना दणका देत टीकाकारांना चोख उत्तर देतो का? याकडेही साऱ्यांचं लक्ष असणार आहे.