आयपीएलच्या 18 व्या मोसमात आतापर्यंत 32 सामने खेळवण्यात आले आहेत. या 32 व्या सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स आमनेसामने होते. या सामन्याचा निकाल सुपर ओव्हरद्वारे लागला. दरम्यान एका बाजूला या 10 संघांमध्ये एका ट्रॉफीसाठी चुरस पाहायला मिळत आहेत. तर दुसऱ्या बाजूला फलंदाजांमध्ये ऑरेंज कॅपसाठी चुरस पाहायला मिळत आहे.
ऑरेंज कॅपच्या शर्यतीत पहिल्या 5 फलंदाजांपैकी 3 भारतीय खेळाडू आहेत. तर 2 परदेशी खेळाडू आहे. एका मोसमात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ऑरेंज कॅपचा विजेता ठरतो. तर हंगामादरम्यान सर्वाधिक धावांनुसार ऑरेंज कॅपची अदलाबदल होत असते. तसेच सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅपने सन्मानित केलं जातं.
टॉप 5 मध्ये कोण?
दिल्ली विरुद्ध राजस्थान सामन्यानंतर लखनौ सुपर जायंट्सचा विस्फोटक फलंदाज निकोलस पूरन ऑरेंज कॅपच्या शर्यतीत पहिल्या स्थानी आहे. गुजरात टायटन्सचा साई सुदर्शन दुसऱ्या स्थानी आहे. लखनौचा मिचेल मार्श तिसऱ्या, पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यर चौथ्या तर आरसीबीचा विराट कोहली पाचव्या क्रमांकावर आहे.
कुणाच्या नावावर किती धावा?
निकोलस पूरन, 7 सामने आणि 357 धावा
साई सुदर्शन, 6 सामने 329 धावा
मिचेल मार्श, 6 सामने 295 धावा
श्रेयस अय्यर, 6 सामने 250 धावा
विराट कोहली, 6 सामने 248 धावा
पर्पल कॅपच्या शर्यतीत कोण?
पर्पल कॅपच्या शर्यतीत टॉप 5 मध्ये 4 भारतीय गोलंदाज आहेत. या 5 गोलंदाजांमध्ये अनुक्रमे नूर अहमद (सीएसके), कुलदीप यादव (दिल्ली), खलील अहमद (चेन्नई), शार्दुल ठाकुर (लखनौ) आणि वरुण चक्रवर्ती (केकेआर) यांचा समावेश आहे.
निकोलस पूरन आणि नूर अहमद नंबर 1
नूर अहमद याच्या नावावर सर्वाधिक 12 विकेट्स आहेत. तर कुलदीप, खलील आणि शार्दुल या तिघांच्या नाववर प्रत्येकी 11 विकेट्स आहेत. तर वरुण चक्रवर्ती याच्या नावावर 10 विकेट्स आहेत.