भारताचा वेस्ट इंडिजला धक्का , दिल्ली कसोटी जिंकत भारताने वेस्ट इंडिजला चारली धूळ
भारताचा वेस्ट इंडिजला धक्का , दिल्ली कसोटी जिंकत भारताने वेस्ट इंडिजला चारली धूळ
img
वैष्णवी सांगळे
टीम इंडियाने वेस्ट इंडिज विरुद्ध सलग आणि एकूण दुसरा कसोटी सामना जिंकला आहे. विंडीजने भारताला 121 धावांचं आव्हान दिलं होतं. भारताने हे आव्हान 3 विकेट्सच्या मोबदल्यात 35.2 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. भारताने या विजयासह विंडीजला 2-0 अशा फरकाने व्हाईटवॉश केलं आहे. टीम इंडियाचा विंडीज विरुद्धचा सलग 10 वा तर शुबमन गिल याच्या नेतृत्वातील पहिला कसोटी मालिका विजय ठरला आहे. 


शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया पहिल्यांदाच घरच्या मैदानावर वेस्टइंडीजविरुद्ध कसोटी मालिकेसाठी उतरली. अहमदाबादमधील पहिली कसोटी जिंकल्यानंतर भारतीय संघाने जबरदस्त आत्मविश्वासाने दिल्लीतील दुसऱ्या कसोटीतही विजय मिळवत वेस्टइंडीजला धूळ चारली. दिल्ली कसोटीत यशस्वी जैस्वाल आणि कर्णधार शुभमन गिल यांच्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने पहिल्या डावात तब्बल 518 धावांचा डोंगर उभारला.

 प्रत्युत्तरात वेस्टइंडीजचा पहिला डाव केवळ 248 धावांवर गडगडला आणि त्यांना फॉलो-ऑन मिळाला. दुसऱ्या डावात वेस्टइंडीजने काहीशी झुंज दिली आणि 390 धावा केल्या, परंतु त्यामुळे भारतासमोर फक्त 120 धावांचे सोपे लक्ष्य उभे राहिले. हे लक्ष्य टीम इंडियाने पाचव्या दिवशी सहज पार करत दणदणीत विजय मिळवला आणि मालिकेत वर्चस्व गाजवले. पण सलग 2 विजयानंतरही डब्ल्यूटीसी पॉइंट टेबलमध्ये टीम इंडिया तिसऱ्याच स्थानावर दिसत आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group