टीम इंडियाचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने आयपीएलमधून निवृत्ती जाहीर केली आहे. सोशल मीडिया पोस्टद्वारे त्याने आपल्या १६ वर्षांच्या आयपीएल कारकिर्दीला पूर्णविराम दिला. १६ वर्षांच्या आयपीएल कारकिर्दीत, अश्विनने एकूण २२१ सामने खेळले. त्याने इंडियन प्रीमियर लीगमध्ये ५ संघांचे प्रतिनिधित्व केले. डिसेंबर २०२४ मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्या पाठोपाठ आता आर. अश्विनने आपली आयपीएलमधून निवृत्तीची घोषणा करून सर्वांना आश्चर्यचकित केलंय.
हे ही वाचा
आर अश्विनने २००९ मध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तो रायझिंग पुणे सुपरजायंट्स, पंजाब किंग्ज, दिल्ली कॅपिटल्स आणि नंतर राजस्थान रॉयल्सकडून खेळला. गेल्या हंगामात (आयपीएल २०२५) तो चेन्नई सुपर किंग्जमध्ये परतला, ज्यामध्ये खेळल्यानंतर त्याने आज क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
हे ही वाचा
अश्विनची सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं की, "खास दिवस आणि म्हणूनच एक खास सुरुवात. ते म्हणतात की प्रत्येक समाप्तीची एक नवीन सुरुवात होते. आयपीएलमधील क्रिकेटपटू म्हणून माझी वेळ आज संपत आहे, पण आता वेगवेगळ्या लीगमध्ये खेळाचा माझा प्रवास आजपासून सुरू होत आहे. मला इतकी वर्षे चांगल्या आठवणी आणि संबंध दिल्याबद्दल सर्व फ्रँचायझींचे आभार. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, मला आतापर्यंत जे काही दिले, त्याबद्दल आयपीएल आणि बीसीसीआयचेही आभार. मी भविष्याचा आनंद घेण्यासाठी आणि त्याचा पुरेपूर उपयोग करण्यासाठी उत्सुक आहे."