क्रिकेटविश्वावर शोककळा पसरली आहे. उत्कृष्ट सलामीवीर फलंदाज, अप्रतिम क्षेत्ररक्षक आणि उपयुक्त फिरकी गोलंदाज म्हणून प्रसिद्ध असलेले ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार बॉब सिम्पसन यांचे वयाच्या ८९ व्य वर्षी दुःखद निधन झाले. बॉब हे १९६० च्या दशकातील ऑस्ट्रेलियन संघाचे मुख्य आधारस्तंभ होते.
बॉब सिम्पसन यांनी ऑस्ट्रेलियाला पहिला वर्ल्ड कप जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. बॉब सिम्पसन यांनी निवृत्तनंतर कोच म्हणून भूमिका बजावली. बॉब सिम्पसन यांना कमबॅकसाठी क्रिकेटविश्वात ओळखलं जाते. बॉब सिम्पसन यांनी वयाच्या ४१ व्या कमबॅक केले होते. बॉब सिम्पसन यांनी ६२ कसोटी २ एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यांना अनेक पुरस्कारांनीही गौरवण्यात आले आहे.
त्यांनी ऑस्ट्रेलिया आणि न्यू साउथ वेल्सचे कर्णधार आणि प्रशिक्षक म्हणून क्रिकेटमध्ये काम पाहिले आहे. सिम्पसन यांनी १९९९ मध्ये इंग्लंडमधील विश्वचषक स्पर्धेत भारतासाठी सल्लागार म्हणून काम केले आणि २०१३ मध्ये त्यांना आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट करण्यात आले.