चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडियासाठी आनंदाची बातमी!  स्टार गोलंदाज फिट होऊन उतरला रणजी सामन्यात
चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडियासाठी आनंदाची बातमी! स्टार गोलंदाज फिट होऊन उतरला रणजी सामन्यात
img
Dipali Ghadwaje
19 फेब्रुवारी पासून चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात होणार आहे. यापूर्वी टीम इंडियाचे अनेक खेळाडू रणजी ट्रॉफी सामन्यात खेळण्यासाठी उतरले आहेत. अशातच मागील काही महिन्यांपासून दुखापतीने त्रस्त असलेला टीम इंडियाचा स्टार गोलंदाज कुलदीप यादव देखील पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात रणजी ट्रॉफी सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला आहे.

सर्जरी झाल्यामुळे ऑक्टोबर पासून क्रिकेटच्या मैदानावर न उतरलेला कुलदीप यादव  रणजी सामन्यात उत्तर प्रदेशच्या  एलीट ग्रुप C मधून मध्य प्रदेश विरुद्ध सामना खेळत आहे. 

इंदोर येथे उत्तर प्रदेश एलीट ग्रुप C विरुद्ध मध्यप्रदेश यांच्यात सामना गुरुवारपासून सुरु झाला. या सामन्यात कुलदीपच्या संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.

पहिल्या सत्रात मध्यप्रदेशने एकही विकेट न गमावता 106 धावा केल्या. कुलदीप मध्यप्रदेशच्या फलंदाजासमोर गोलंदाजी करताना त्यांच्या करता जास्त अडचण निर्माण करू शकला नाही. कुलदीपने 5 ओव्हर टाकले आणि 19 धावा दिल्या. त्याला मेडन ओव्हर किंवा एकही विकेट घेता आली नाही.

गोलंदाज कुलदीप यादवने शेवटचा सामना हा ऑक्टोबर महिन्यात टेस्ट क्रिकेट न्यूझीलंड विरुद्ध बंगळुरू येथे खेळला होता. दरम्यान गोलंदाजी करताना त्याची कंबर आणि ग्रोइनची जुनी दुखापत पुन्हा झाली ज्यातून बरं होण्यासाठी त्याला जर्मनी येथे जाऊन शस्त्रक्रिया करावी लागली. 

या दुखापतीतून सावरण्यासाठी कुलदीप यादवला प्रथम बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये पाठवण्यात आले. तपासणी केल्यानंतर एनसीएच्या डॉक्टरांनी त्याला उपचारासाठी जर्मनीला पाठवण्याचा सल्ला दिला, जिथे त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी कुलदीप यादवचा टीम इंडियात समावेश करण्यात आलेला आहे. रणजी ट्रॉफी सामन्यात कुलदीपचा परफॉर्मन्स कसा असेल हे पाहणं देखील उत्सुकतेचं ठरणार आहे. 
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group