यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सची गाडी रूळावर येताना दिसतेय. गुरुवारी झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबादचा पराभव करत विजय मिळवला.
या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना हैदराबादने १६२ रन्स केले होते. या आव्हानाचा सामना करताना १९ व्या ओव्हरच्या पहिल्या बॉलमध्ये तिलकने फोर मारून मुंबईला विजय मिळवून दिला.
दरम्यान सनरायझर्स हैदराबादच्या पराभवानंतर फलंदाज इशान किशन काहीसा नाराज दिसून आला. पहिल्या सामन्यानंतर त्याला पुढे कोणत्याही सामन्यात चांगली फलंदाजी करता आली नाही. मुंबई विरूद्धच्या सामन्यात देखील इशान किशनचा खेळ खराब झाला. सामन्यानंतर तो काहीसा चिंतेत होता मात्र अशातच नीता अंबानी त्याला सपोर्ट करताना दिसल्या.
नीता अंबानींना भेटला इशान किशन?
सामन्यानंतर मुंबई इंडियन्सच्या मालकीण नीता अंबानींची इशान किशनने भेट घेतली. आयपीएल २०२५ च्या ऑक्शनपूर्वी तब्बल ७ वर्ष इशान किशन मुंबईच्या टीमसोबत होता. मात्र यंदाच्या ऑक्शनमध्ये त्याला हैदराबादने खरेदी केलं. यानंतर पहिल्यांदाच इशान मुंबईविरूद्ध खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. मात्र या सामन्यात त्याची बॅट शांत होती. असं असूनही सामन्यानंतर एक भावनिक क्षण पाहायला मिळाला.
नीता अंबानींना केला नमस्कार
सामन्याचा निकाल लागल्यानंतर खेळाडू हस्तांदोलन करत आपापल्या टीमकडे जात होते. त्यावेळी इशान किशन नीता अंबानींकडे गेला आणि हसून त्यांना नमस्कार केला. नीता अंबानींनी देखील त्याला प्रेमाने प्रत्युत्तर दिलं. यावेळी त्यांनी प्रेमाने त्याच्या गालावर हात ठेऊन चर्चा केली. यावेळी काही वेळ बोलून तो आपल्या टीमसोबत निघून गेला.