पुराच्या पाण्यात अडकलेल्या भारतीय महिला क्रिकेटपटूने पोस्ट करत मानले NDRFच्या पथकाचे आभार
पुराच्या पाण्यात अडकलेल्या भारतीय महिला क्रिकेटपटूने पोस्ट करत मानले NDRFच्या पथकाचे आभार
img
Dipali Ghadwaje
गुजरातमध्ये सध्या अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. याशिवाय हजारो लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. या पुरामध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाची गोलंदाज राधा यादवही अडकली होती. वडोदरा येथे आलेल्या पुरामुळे राधा यादव अडकली होती.

यानंतर NDRFने त्यांना मदत केली. आता तिने सोशल मीडियावर एनडीआरएफचे आभार मानले आहेत. राधा यादव महिला टी-२० विश्वचषकासाठी टीम इंडियाचा एक भाग आहे. आपल्या बचावाची माहिती देताना तिने आपल्या भागातील एक व्हिडिओही शेअर केला आहे.

संपूर्ण परिसर पाण्यात बुडाल्याचे स्पष्टपणे दिसून येते. रस्त्यांना तलावाचे स्वरूप आले आहे. वाहने पाण्यात बुडालेली दिसली. या व्हिडिओमध्ये अनेक लोक पाण्यातून पुढे जाण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. तेवढ्यात एनडीआरएफची टीम राधाला वाचवण्यासाठी येते. संपूर्ण परिसरातील परिस्थिती अत्यंत बिकट असल्याचे तिने म्हटले आहे.

राधा यादवने सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले, “आम्ही खूप वाईट परिस्थितीत अडकलो होतो. आम्हाला वाचवल्याबद्दल NDR चे खूप खूप आभार.” तिने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या फोटोमध्ये संपूर्ण परिसर पाण्यात बुडाल्याचे दिसत आहे. नजर जाईल तिथपर्यंत फक्त पाणीच पाणी आहे. बचाव पथक सतत लोकांना सुरक्षित स्थळी नेत आहे. रस्ते अनेक फूट पाण्यात बुडाले आहेत. वडोदरा येथे पावसामुळे विश्वामित्री नदीचा बंधारा तुटल्याने सखल भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे.

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group