IPL : केकेआरच्या कर्णधारपदी
IPL : केकेआरच्या कर्णधारपदी "या" खेळाडूची वर्णी
img
दैनिक भ्रमर
क्रिकेट विश्वातून महत्वाची बातमी समोर आली आहे. टीम इंडियाच्या युवा आणि मुंबईकर खेळाडूकडे पुन्हा एकदा कर्णधारपदाची सूत्र देण्यात आली आहेत. सोशल मीडियावरुन टीम मॅनेजमेंटने याबाबतची माहिती दिली आहे.

आयपीएलच्या 17 व्या मोसमासाठी येत्या मंगळवारी 19 डिसेंबर रोजी ऑक्शन पार पडणार आहे. अभिनेता शाहरुख खान याच्या मालिकीच्या केकेआर अर्थात कोलकाता नाईट रायडर्सने श्रेयस अय्यर याची कर्णधारपदी फेरनियुक्ती केली आहे.

श्रेयसला कर्णधार केल्याने 16 व्या मोसमात केकेआरचं नेतृत्व करणाऱ्या नितीश राणाला उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. केकेआर टीम मॅनेजमेंटने एक्स अकाउंटवरुन याबाबत क्रिकेट चाहत्यांना कळवलं आहे.

श्रेयस अय्यर याला आयपीएल 16 व्या मोसमातून पाठीच्या दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली. त्यामुळे नितीश राणा याच्याकडे कर्णधारपदाची सूत्र देण्यात आली. मात्र श्रेयस गेल्या अनेक महिन्यांआधी या दुखापतीतून सावरला आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group