भारताचा माजी सलामीवीर शिखर धवन याच्या घरी दुसऱ्यांदा सनई चौघडे वाजणार आहेत. शिखर धवन आपली गर्लफ्रेंड आणि आयर्लंडच्या सोफी शाईन हिच्यासोबत लवकरच लग्न करणार आहे. मागच्या अनेक दिवसांपासून शिखर आणि सोफी शाईन यांच्या रिलेशनच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र आता या चर्चाना पूर्णविराम मिळाला असून हे दोघेही लवकरच नवीन आयुष्याची सुरुवात करणार आहे.
नवी दिल्ली येथे या भव्य विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात दिल्ली-एनसीआरमध्ये ग्रँड वेडीग पार पडणार असून दिग्गज महारथी या सोहळ्यास उपस्थित राहणार आहे.
शिखर अन् सोफी यांची भेट काही वर्षापूर्वी दुबईत झाली होती. दोघे पहिल्यांदा मित्र झाले. त्यानंतर ही मैत्री हळूहळू प्रेमात रूपांतरित झाली. यानंतर आयपीएल २०२४ मध्ये सोफी अनेकवेळा दिसली. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 दरम्यान जेव्हा ते स्टेडियममध्ये एकत्र दिसले, तेव्हापासूनच त्यांच्या नात्याची चर्चा सुरू झाली होती.
कोण आहे सोफी शाईन?
शिखरची होणारी दुसरी बायको ही भारताची नसून आयर्लंडची रहिवासी आहे आणि तिचे शिक्षण देखील तिकडेच झाले आहे. सोफी एक आयरीश प्रोडक्ट कंसल्टंट आहे. तिच्याकडे लिमरिक इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीची मार्केटिंगची डिग्री आहे. तिने आयर्लंडच्या कॅसलरॉय कॉलेजमधून शिक्षण घेतलं आहे. सध्या ती अबू धाबी युएई इथं नॉर्दन ट्रस्ट कॉर्पोरेशनमध्ये व्हाईस प्रेसिडेंट पदावर आहे. एवढेच नाही तर ती शिखर धवनच्या 'दा वन स्पोर्टस या उपक्रमांतर्गत चालणाऱ्या शिखर धवन फाउंडेशन चे कामही सांभाळत आहे. ती फारशी प्रकाशझोतात रहात नाही. मात्र तरी देखील तिच्या स्टायलिश लूक अन् फोटोंची चर्चा असते.
२०२३ मध्ये घटस्फोट
शिखर धवनचं हे दुसरं लग्न आहे. यापूर्वी त्याने आयशा मुखर्जीसोबत लग्न केलं होतं. त्यांना जोरावर हा मुलगा देखील आहे. धवनने त्याच्यापेक्षा १० वर्षाने मोठ्या आएशा सोबत लग्न केलं होतं. आएशा ही किक बॉक्सर आहे. शिखरने २०१२ मध्ये लग्न केलं होतं. मात्र २०२१ मध्ये आएशा आणि धवन हे एकमेकांपासून वेगळे झाले. २०२३ मध्ये त्यांचा अधिकृत घटस्फोट झाला होता.