दैनिक भ्रमर : बीसीसीआय निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी पत्रकार परिषदेतून आगामी आणि बहुप्रतिक्षित आशिया कप 2025 स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. भारतीय संघाची घोषणा करण्याआधी मुंबईत बीसीसीआयच्या मुख्यालयात अजित आगरकर आणि टी 20 कर्णधार सूर्यकुमार यादव यांच्यात बैठक पार पडली. त्यानंतर दोघांनी पत्रकार परिषदेला संबोधित करताना आशिया कप स्पर्धेसाठी भारतीय संघात संधी देण्यात आलेल्या खेळाडूंची नावं जाहीर केली आहेत.
आशिया खंडातील सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा असलेल्या आशिया कपसाठी टीम इंडियाची निवड जाहीर झाली आहे. ९ सप्टेंबरपासून ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. यंदा ही स्पर्धा T20 फॉरमॅटमध्ये खेळवली जाणार आहे. यावेळी टीम इंडियाच्या T20 टीमचा कॅप्टन सूर्यकुमार यादव संघाचं नेतृत्व करेल. निवड समितीनं मुंबईमध्ये टीमची निवड जाहीर केली.या टीममध्ये T20 स्पेशालिस्ट खेळाडूंच समावेश आहे.
आशिया कप 2025 साठी भारतीय टीम इंडिया : सूर्यकुमार यादव (कॅप्टन), शुबमन गिल (व्हाईस कॅप्टन), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (विकेट किपर), जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, संजू सॅमसन, हर्षित राणा आणि रिंकू सिंह
यांचा सहभाग नाही
इंग्लंड दौरा गाजवलेले ओपनर्स यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल यांची T20 टीममध्ये निवड झालेली नाही. तर श्रेयस अय्यरला पुन्हा एकदा निराशा सहन करावी लागली आहे.