टी २० विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात १५ शिलेदारांची नावे आज जाहीर करण्यात आली. या संघात शुभमन गिल आणि जितेश शर्मा यांना स्थान मिळालेले नाही. तर मुंबईकर श्रेयस अय्यर, जितेश शर्मा, नितीशकुमार रेड्डी, केएल राहुल, प्रसिद्ध कृष्णा, ऋषभ पंत यांना १५ जणांच्या चमूमध्ये स्थान मिळाले नाही.
टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा केल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कारण या संघातून शुबमन गिलला वगळण्यात आलं आहे. तसेच अक्षर पटेलला संधी मिळाली असून त्याच्याकडे उपकर्णधारपद सोपवण्यात आलं आहे. दुसरीकडे, रिंकु सिंह आणि इशान किशन यांचं टीम इंडियात कमबॅक झालं आहे.
भारत आणि श्रीलंका या दोन देशामध्ये २०२६ चा टी२० विश्वचषक होणार आहे. ७ फेब्रुवारी ते ८ मार्च या दरम्यान विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. २० या स्पर्धेत २० संघ ४ गटात विभागण्यात आले आहे. पहिल्याच दिवशी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर ७ फेब्रुवारीला भारत आणि अमेरिका संघात होईल.
टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघ -
सूर्यकुमार यादव (कर्णधार) , अक्षर पटेल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा , हार्दिक पांड्या , शिवम दुबे , तिलक वर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर)
, रिंकू सिंह , वरूण चक्रवर्ती , कुलदीप यादव , वॉशिंगटन सुंदर , जसप्रीत बुमराह , अर्शदीप सिंह, हर्षित राणा
मुख्य कोच - गौतम गंभीर