बेकायदेशीर कामे करण्याची हिंमत कशी होते?, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन प्रकरणी रोहित पवारांना सुप्रीम कोर्टाने सुनावलं
बेकायदेशीर कामे करण्याची हिंमत कशी होते?, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन प्रकरणी रोहित पवारांना सुप्रीम कोर्टाने सुनावलं
img
वैष्णवी सांगळे
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना सुप्रीम कोर्टाने खडे बोल सुनावले आहे. इतकी बेकायदेशीर कामे करण्याची हिंमत कशी होते, असा थेट सवालच सुप्रीम कोर्टाने रोहित पवारांना विचारला आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची सदस्यसंख्या 154 वरुन वाढवून 571 त्यांनी नेली. त्यामध्ये रोहित पवारांनी सदस्य करून घेतलेल्यांमधे त्यांची पत्नी कुंती , सासरे सतिश मगर यांच्यासह सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती सदानंद सुळे यांचाही सामावेश आहे. त्याचबरोबर रोहित पवारांच्या कंपन्यांमध्ये काम करणारे कर्मचारी देखील सदस्य करून घेण्यात आलेत. त्याचबरोबर अनेक राजकीय नेते आणि शैक्षणिक संस्थांना देखील ऐन निवडणुकीच्या तोंडावर सदस्य करून घेण्यात आलेय असा आरोप केदार जाधव यांनी केला होता.

आमदार रोहित पवारांनी पवार कुटुंबातील सदस्यांसह ४०० आजीवन सदस्य नोंदवले होते. त्याविरोधात टीम इंडियाचा माजी क्रिकेटर केदार जाधव यांनी याचिका दाखल केली होती. त्यावरुन सुप्रीम कोर्टाने रोहित पवारांना झापलंय. बीसीसीआय प्रकरणी निकाल दिल्यानंतर सदस्य नोंदणीला सुप्रीम कोर्टाची परवानगी लागते. आधी एमसीएच्या संविधानात तसा बदल करावा लागतो, याची माहिती असूनही बेकायदेशीर काम केल्याचा ठपका रोहित पवारांवर आहे. याच प्रकरणात सुप्रीम कोर्टाने रोहित पवारांना खडे बोल सुनावले. 

केदार जाधव यांच्या याचिकोनंतर हायकोर्टाने अंतरिम स्थगिती दिली होती. त्याविरोधात रोहित पवार सुप्रीम कोर्टात गेले होते. यावर सुप्रीम कोर्टाने तीव्र नाराजी व्यक्त केली. इतकी बेकायदेशीर कामे करण्याची हिंमत कशी होते, असा सवाल सुप्रीम कोर्टाने केला. सुप्रीम कोर्टाच्या इशाऱ्यानंतर अखेर रोहित पवारांनी याचिका मागे  घेतली.

रोहित पवारांनी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची सत्ता टिकवण्यासाठी मनमानी पद्धतीने संघटनेची सदस्यसंख्या वाढवल्याचा आरोप भारताचा माजी क्रिकेटपटू केदार जाधवने केला होता . केदार जाधव हा महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचा सदस्य असून भारतीय जनता पक्षाचा पदाधिकारी देखील आहे . रोहित पवारांनी आपल्या बाजूने मतदान व्हावं यासाठी एम सी ए ची सदस्यसंख्या 154 वरुन वाढवून 571 नेली. त्यासाठी रोहित पवारांनी  सदस्य करून घेतलेल्यांमधे त्यांची पत्नी कुंती , सासरे सतिश मगर यांच्यासह सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती सदानंद सुळे यांचाही सामावेश आहे. त्याचबरोबर रोहित पवारांच्या कंपन्यांमध्ये काम करणारे कर्मचारी देखील सदस्य करून घेण्यात आलेत. त्याचबरोबर अनेक राजकीय नेते आणि शैक्षणिक संस्थांना देखील ऐन निवडणुकीच्या तोंडावर सदस्य करून घेण्यात आलेय असा आरोप केदार जाधव यांनी केला होता.
इतर बातम्या
Join Whatsapp Group