क्रिकेट म्हणजे अनेकांचा जीव की प्राण. क्रिकेटपटूंच्या आयुष्यात नेमकं काय चालू आहे यावर देखील अनेक जण search करत असतात. दरम्यान काही क्रिकेटपटूंनी धर्मबदलाचा निर्णय घेतला, या निर्णयामुळे क्रिकेटप्रेमींना मोठा धक्का बसला. यामध्ये भारताचे क्रिकेटपटू विनोद कांबळी यांचं देखील नाव आहे.. ज्यांनी स्वतःचा धर्म बदलला, आज अशा 5 दिग्गज क्रिकेटपटूंबद्दल जाणून घेऊया.
सूरज रणदीव – श्रीलंका
श्रीलंकेचा माजी फिरकी गोलंदाज सूरज रणदिव यानेही इस्लाम धर्म स्वीकारला. मोहम्मद मार्शूक मोहम्मद सूरज या नावाने जन्मलेला रणदिव हा मुस्लिम होता. पण मुस्लीम धर्माचा त्याग करत त्याने हिंदू धर्म स्वीकारलेला… त्यानंतर त्याने स्वतःचं नाव सूरज रणदीव ठेवलं… सध्या तो ऑस्ट्रेलिया येथे राहतो आणि तेथेच स्थायिक झाला आहे.
मोहम्मद यूसुफ – पाकिस्तान
यादीत सर्वात पहिलं नाव दिग्गज पाकिस्तानी फलंदाज युसूफ युहाना याचं आहे. युसूफचा जन्म एका ख्रिश्चन कुटुंबात झाला होता. मात्र, 2005 मध्ये त्याने इस्लाम धर्म स्वीकारला आणि आपले नाव बदलून मोहम्मद युसूफ असं ठेवलं. 2006 मध्ये, त्याने कसोटी क्रिकेटच्या एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावा (1788 धावा) करण्याचा ऐतिहासिक विश्वविक्रम प्रस्थापित केला.
तिलकरत्ने दिलशान – श्रीलंका
श्रीलंकेचे महान सलामीवीर फलंदाज तिलकरत्ने दिलशान याचा जन्म तुवान मोहम्मद दिलशान या नावाने एका मुस्लिम कुटुंबात झाला. त्याचे वडील मुस्लिम आणि आई बौद्ध होती. पण आई – वडिलांच्या घटस्फोटानंतर तिलकरत्ने याने इस्लाम धर्माचा त्याग करत बैद्ध धर्म स्वीकारला… त्यानंतर क्रिकेटपटूने स्वतःचं नाव बदललं आणि तिलकरत्ने मुदियानसेलागे दिलशान ठेवलं.
महमुदुर रहमान राणा :बांगलादेश
बांग्लादेशच्या महमूदुल हसनचा जन्म 1982मध्ये हिंदू कुटुंबात झाला. त्याचं नाव विकास रंजन दास असं होतं. पण त्याने हिंदू धर्म सोडून इस्लाम स्वीकारला. विकासने आपलं नाव बदलून महमुदूर रहमान राणा ठेवलं. त्याने महमूदुल हसनच्या नावाने टीमसाठी एक टेस्ट मॅच खेळला. त्यानंतर तो कधीच खेळला नाही.
ए जी कृपाल सिंग :भारत
भारतीय क्रिकेटपटू कृपाल सिंग हे धर्मांतर करणारे पहिले क्रिकेटपटू होते. शीख कुटुंबात त्यांचा जन्म झाला. लग्नासाठी त्यांनी ख्रिश्चन धर्म कबुल केला. करिअर उत्तम चाललेलं असतानाच एका ख्रिश्चन मुलीच्या तो प्रेमात पडला. त्यामुळे तिच्याशी लग्न करण्यासाठी त्याने धर्मांतर केलं. त्यानंतर त्याने ए जी कृपाल सिंग ऐवजी अर्नोल्ड जॉर्ज असं ठेवलं. त्याने पगडी घालणं बंद केलं आणि दाढीही काढून टाकली.
विनोद कांबळी – भारत
भारताने पूर्व क्रिकेटर विनोद कांबळी त्यांच्या धर्मांतरानंतर चर्चेत आलेले… कांबळी यांचा जन्म हिंदू धर्मात झालेला. पण त्यांनी जेव्हा ख्रिश्चन गर्लफ्रेंड एंड्रिया हिच्यासोबत लग्न केलं, तेव्हा कांबळी यांनी देखील ख्रिश्चन धर्म स्वीकारलेला. एंड्रिया आणि विनोद यांना एका मुलगा देखील आहे. त्यांच्या मुलाचं नाव जीझस क्रिस्टियानो असं आहे. कांबळी यांनी एका मुलाखतीत सांगितल्यानुसार, ते सर्व धर्मांचा आदर करतात, परंतु पत्नीच्या श्रद्धेचे पालन करण्यासाठी त्यांनी ख्रिश्चन धर्माची निवड केली.
वेन पार्नेल – दक्षिण आफ्रिका
दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटपटू वेन पार्नेल (Wayne Parnell) याने 2011 मध्ये इस्लाम धर्माचा स्वीकार केला. इस्लाम धर्माचा स्वीकार केल्यानंतर त्याने स्वतःचं नाव बदललं आणि वलीद ठेवलं… पण क्रिकेट विश्वात आजही त्याला ‘वेन पार्नेल’ नावानेच ओळखलं जातं… धर्मांतरानंतर, पार्नेलने स्पष्ट केलं होतं की, त्याचा निर्णय पूर्णपणे वैयक्तिक होता आणि त्याने त्यावर बराच काळ अभ्यास केलेला.
सूरज रणदीव – श्रीलंका
श्रीलंकेचा माजी फिरकी गोलंदाज सूरज रणदिव यानेही इस्लाम धर्म स्वीकारला. मोहम्मद मार्शूक मोहम्मद सूरज या नावाने जन्मलेला रणदिव हा मुस्लिम होता. पण मुस्लीम धर्माचा त्याग करत त्याने हिंदू धर्म स्वीकारलेला… त्यानंतर त्याने स्वतःचं नाव सूरज रणदीव ठेवलं… सध्या तो ऑस्ट्रेलिया येथे राहतो आणि तेथेच स्थायिक झाला आहे.