आयसीसीनं बांगलादेशला काल इशारा देत भारतात टी 20 वर्ल्ड कप खेळावा लागेल असं सांगितलं होतं. बांगलादेश सरकारच्या निर्णयानुसार बांगलादेश क्रिकेट बोर्डानं यापूर्वी त्यांचे सामने सुरक्षेच्या कारणामुळं श्रीलंकेत खेळवावेत, अशी मागणी केली होती.
मात्र, आयसीसीनं बांगलादेश क्रिकेट बोर्डासोबत चर्चा केली होती. बांगलादेशच्या बोर्डाला 21 जानेवारीपर्यंत अंतिम निर्णय कळवण्यासाठी मुदत दिली होती. बांगलादेश त्यांच्या भूमिकेवर ठाम असून त्यांनी भारतात टी 20 वर्ल्ड कप खेळण्यास नकार दिला आहे.
बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या प्रतिनिधींनी टी 20 वर्ल्ड कपचे सामने श्रीलंकेत खेळायचं असल्याचं म्हटलं आहे. मात्र, आयसीसीनं बांगलादेशची मागणी धुडकावून लावली आहे. बांगलादेशनं टी 20 वर्ल्ड कपवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्यानं आता त्यांच्या जागी स्कॉटलंडला संधी मिळण्याची शक्यता आहे.