भारतीय खेळाडू युजवेंद्र चहलची तब्येत बिघडली; २ गंभीर आजारांची लागण
भारतीय खेळाडू युजवेंद्र चहलची तब्येत बिघडली; २ गंभीर आजारांची लागण
img
वैष्णवी सांगळे
टीम इंडियाचा अनुभवी फिरकीपटू युझवेंद्र चहल याच्यासाठी गेली काही महिने फार संघर्षाची राहिली आहेत. युझवेंद्र गेल्या अनेक महिन्यांपासून टीम इंडियातून बाहेर आहे. युझवेंद्र गेल्या काही महिन्यांत क्रिकेटमधील कामगिरीपेक्षा त्याच्या वैयक्तिक जीवनातील घडामोडींमुळे चर्चेत राहिला. आता युझीच्या अडचणीत वाढ झाली आहे.

युझीला एकाच वेळेस 2 आजाराने ग्रासलं आहे. युझीला एकाच वेळेस डेंग्यू आणि चिकनगुनिया झाला आहे. त्यामुळे युझीला सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025 स्पर्धेतील हरयाणा विरुद्ध झारखंड यांच्यातील अंतिम सामन्याला मुकावं लागलं आहे. आजारपणामुळे चहलला सैयद मुश्ताक अली ट्रॉफीचा फायनल सामनाही खेळता आला नाही. चहलने स्वतः याबाबत माहिती दिली.

चहलने त्याचा शेवटचा सामना सैयद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये खेळला. गेल्या महिन्यात तो हरियाणाकडून ग्रुप मॅचमध्ये खेळला होता. त्यानंतर आता त्याला डेंग्यू आणि चिकुनगुनिया झाल्याची माहिती आहे. या आजारणामुळे तो पुढचे काही महिने क्रिकेटच्या मैदानापासून दुर राहणार आहे. ३० नोव्हेंबरपासून तो देशांतर्गत क्रिकेटमधून देखील बाहेर आहे. गुरुवारी पुण्यात झालेल्या झारखंड विरूद्धचा फायनल सामनाही त्याने गमावला.

फायनल सामन्यापूर्वी चहलने त्याच्या टीमला शुभेच्छा दिल्या होत्या. चहलने त्याच्या इन्स्टाग्रामवरून एक पोस्ट केली. यामध्ये त्याने लिहिलंय की, SMAT फायनल गाठणाऱ्या माझ्या हरियाणाच्या टीमला खूप शुभेच्छा. टीमचा भाग व्हायची माझीही इच्छा होती मात्र दुर्दैवाने मला डेंग्यू आणि चिकुनगुनियाची लागण झाली आहे. ज्यामुळे माझी तब्येत खालावली आहे.

दरम्यान चहल कमबॅक कधी करणार याबाबत त्याने माहिती दिलेली नाही. विजय हजारे ट्रॉफीमध्ये तो मैदानात उतरेल अशी शक्यता वर्तवण्यात येतेय. गेल्या वर्षी झालेल्या टी २० वर्ल्डकपनंतर चहलचं टीम इंडियामध्ये सिलेक्शन करण्यात आलेलं नाही.
इतर बातम्या
Join Whatsapp Group