युजवेंद्र चहलच्या आयुष्यात नुसतीच चहल पहल ; अगोदर पत्नी सोडून गेली आणि आता...
युजवेंद्र चहलच्या आयुष्यात नुसतीच चहल पहल ; अगोदर पत्नी सोडून गेली आणि आता...
img
वैष्णवी सांगळे
भारतीय क्रिकेटर युजवेंद्र चहल हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या खासगी आयुष्यामुळे चांगलाच चर्चेत आहे. लग्नाला ४ वर्ष पूर्ण झाल्यानंतर चहल याने 2025 मध्ये पत्नी धनश्री वर्मा हिच्यासोबत घटस्फोट घेतला. धनश्री वर्मा हिच्यासोबतच्या घटस्फोटानंतर युजवेंद्र चहलचे नाव आरजे महवश हिच्यासोबत जोडले जात होते. 

युजवेंद्र चहल आणि आरजे महवश दोघे अनेकदा स्पॉट होतानाही दिसले. लंडनमध्ये काही दिवसांपूर्वीच खास वेळ दोघे घालवत होते.  तर युजवेंद्र चहल हा आरजे महवश हिच्यासोबत लग्न करणार असल्याचेही सांगितले जात होते. धनश्री वर्मा हिच्यासोबतच्या घटस्फोटानंतर स्टेडियममध्येही युजवेंद्र चहल आरजे महवश हिच्यासोबत स्पॉट झाला. मात्र, अचानक दोघांनीही सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केले आहे.

फक्त अनफॉलोच नाही तर आरजे महवश हिने युजवेंद्र चहल याच्याबद्दल पोस्ट शेअर करत काही गंभीर आरोप केले. यादरम्यान युजवेंद्र चहल हा अभिनेत्री आणि बिग बॉस फेम शेफाली बग्गा हिच्यासोबत स्पॉट झाला. यानंतर एकच चर्चा रंगताना दिसली की, युजवेंद्र चहल हा शेफाली बग्गा हिला डेट करत आहे. शेफाली बग्गासोबत युजवेंद्र चहल आनंदी देखील दिसला. दरम्यान, आरजे महवश आणि युजवेंद्र चहल यांच्या नात्यात दुरावा नेमका का आला? हे कळू शकले नाही. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group