गेल्या अनेक दिवसांपासून युझवेंद्र चहल त्यांच्या खासगी आयुष्यामुळे सतत चर्चेत आहे. कोरिओग्राफर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर धनश्री वर्मा हिच्याशी त्याचा घटस्फोट झाला होता. दरम्यान त्यावेळी त्याला मानसिकदृष्ट्या खूप संघर्षाला सामोरं जावं लागलं. पहिल्यांदाच चहलने त्याचा हा अनुभव शेअर केला आहे.
नुकताच झालेल्या मुलाखतीत युजवेंद्र चहल याने खासगी आयुष्याबद्दल मोठं वक्तव्य केलं. ‘दोघांमधील वाद बऱ्याच काळापासून सुरु होते. पण आम्ही ठरवलं होतं विभक्त होण्याचा निर्णय होत नाही तोपर्यंत काहीही बोलायचं नाही आणि सोशल मीडियावर देखील सामान्य कपल म्हणून राहू. एक नातं हे समजुतीवर चालतं. एक जण रागावलेला असेल तर दुसऱ्याने समजून घेणं गरजेचं आहे.
हे ही वाचा...
जेव्हा माझा घटस्फोट झाला तेव्हा अनेकांनी मला दगाबाज म्हटलं. पण मी कोणाहीसोबत दगाबाजी केली नाही. माझ्या दोन बहिणी आहेत आणि आई – वडिलांनी कायम मला महिलांचा आदर करायला शिकवलं आहे. जर माझं नाव एखाद्याशी जोडलं जात असेल तर लोकांनी त्याबद्दल काहीही लिहावे हे आवश्यक नाही.’
मानसिक आरोग्याविषयीही चहलने बोलताना सांगितलं की, "संपूर्ण महिनाभर मी फक्त दोन तास झोपत होतो. आत्महत्येचे विचार मनात यायचे. मी हे सगळं माझ्या मित्रांसोबत शेअर केलं होतं. मला क्रिकेटमधून ब्रेकची गरज वाटत होती. अगदी जेव्हा मी मैदानावर असायचो, तेव्हाही माझं मन तिथे नसायचं."