घटस्फोटानंतर युजवेंद्र चहलचं ब्रेकअप? व्हिडीओ पोस्ट करत ‘ती’ म्हणाली....
घटस्फोटानंतर युजवेंद्र चहलचं ब्रेकअप? व्हिडीओ पोस्ट करत ‘ती’ म्हणाली....
img
Dipali Ghadwaje
कोरियोग्राफर धनश्री वर्मा हिला घटस्फोट दिल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचा क्रिकेटर युजवेंद्र चहल याचं नाव आरजे महवश हिच्यासोबत जोडलं जात आहे. अनेकदा दोघांना एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं आहे.

सर्वत्र महवश आणि युजवेंद्र यांच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगलेल्या असताना सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडीओ स्वतः महवश हिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. व्हिडीओमध्ये तिने आपण ब्रेकअपला एवढं महत्त्व का देतो… यावर मोठं वक्तव्य केलं आहे.


व्हिडीओमध्ये महवश म्हणते, ‘आजच्या पीढीचे ब्रेकअप्स एवढे घाणेरडे का असतात? ब्रेकअपला आपल्या आयुष्यातील एका छोटा भाग समजा आणि आयुष्यात पुढे जा. ब्रेकअपनंतर समोरच्या व्यक्तीवर आपण चिडतो रागावतो… अशात समोरच्या व्यक्तीला आपण नसल्याचा कधीच पश्चाताप होत नाही. पण तुम्ही त्या व्यक्तीला माफ केलं तर त्याच्या मनात देखील खंत राहते आपण कोणाला गमावलं आहे. माझ्यावर विश्वास ठेवा… असं करा आणि त्याला जाऊद्या.’

‘तुम्हाला असं वाटत असेल की सर्वकाही तुमच्या हातात आहे. पण असं काहीही नाही सर्वकाही देवाने ठरवलेलं आहे आणि तसंच होणार आहे.’ व्हिडीओ पोस्ट करत आरजे महवश हिने लक्षवेधी कॅप्शन सुद्धा लिहिलं आहे.

व्हिडीओसाठी कॅप्शन लिहित महवश म्हणते, ‘जा तुला माफ केलं, आता तू याठिकाणी आहेच नाही…’ सध्या महवश हिची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

 
युजवेंद्र चहल याच्या घटस्फोटानंतर महवशला क्रिकेटरसोबत अनेकदा स्पॉट करण्यात आलं. म्हणजे तिने पोस्ट केलेला व्हिडीओ चहल साठीच असावा अशी चर्चा चाहत्यांमध्ये रंगली आहे. दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले. पण दोघांनी देखील घटस्फोटावर मौन बाळगलं आहे.

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group