क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि त्याची एक्स पत्नी तसंच कोरिओग्राफर धनश्री वर्मा या दोघांच्या नात्याबद्दल कायमच चर्चा होताना दिसतात. युजवेंद्र व धनश्री वर्मा यांचा ४ वर्षांच्या वैवाहिक जीवनानंतर यावर्षी घटस्फोट झाला. मात्र या घटस्फोटानंतरही त्यांचं नातं अनेकदा चर्चेत येत असतं. धनश्री सध्या ‘Rise And Fall’ या शोमध्ये सहभागी झाली आहे. या शोमधून ती चहलबरोबरच्या नात्याबद्दल व्यक्त होत आहे.
भारतीय क्रिकेटर युजवेंद्र चहलची पूर्वपत्नी आणि प्रसिद्ध कोरिओग्राफर धनश्री वर्माने नुकत्याच एका शोमध्ये धक्कादायक दावा केला आहे, ज्यामुळे सोशल मीडियावर खळबळ माजली आहे. तिने चहलसोबतच्या आपल्या विवाहित आयुष्याबद्दल आणि घटस्फोटाच्या अनुभवांबद्दल मोकळेपणाने बोलली, ज्याचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. त्यावेळी धनश्री युजवेंद्र चहलवर सनसनाटी आरोप केले आहेत.
धनश्रीने खुलासा केला की तिला लग्नाच्या पहिल्याच वर्षात फसवणूक झाल्याचा अनुभव आला. शोमधील एका व्हायरल क्लिपमध्ये, जेव्हा को-कंटेस्टंट कुब्रा सैतने विचारले की, तिला रिलेशनशीप वर्क करणार नाही याची जाणीव कधी झाली? तेव्हा धनश्रीने उत्तर दिले की तिने युजवेंद्र चहलला लग्नाच्या दुसऱ्या महिन्यातच धोका देताना रंगेहात पकडलं होतं. धनश्रीचे हे बोलणे ऐकून कुब्राला मोठा धक्का बसला.
भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांचा मार्च २०२५ रोजी घटस्फोट झाला. दरम्यान, सध्या 'राईज अँड फॉल' या रिअॅलिटी शोमध्ये धनश्री वर्मा सहभागी झाली आहे. या शोमध्ये धनश्री युझवेंद्रसोबतच्या घटस्फोटाबाबत अनेक खुलासे करत आहे.