भारतासह सर्व देशांसाठी टॅरिफचा धोका सध्या टळला, 'ही' नवीन तारीख जाहीर
भारतासह सर्व देशांसाठी टॅरिफचा धोका सध्या टळला, 'ही' नवीन तारीख जाहीर
img
वैष्णवी सांगळे
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी (30 जुलै) भारतावर 25 टक्के कर लागू करण्याची घोषणा केली होती, जी 1 ऑगस्टपासून लागू होणार होती. परंतु ट्रम्प यांनी तूर्तास या नवीन कर लागू करण्याच्या निर्णयाला पुढे ढकललं आहे. परिणामी आता भारताला एक आठवड्याचा वेळ मिळाला आहे. व्हाईट हाऊसने माहिती दिली आहे की नवीन कर हा येत्या 7 ऑगस्ट 2025 पासून लागू होईल.

काँग्रेससह शिवसेना ठाकरे गटाला खिंडार; माजी नगरसेवक, नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश

डोनाल्ड ट्रम्प यांनी भरतासह अनेक देशांवर कर लादण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली आहे. त्यानुसार ट्रम्प यांनी भारतावर 25 टक्के, पाकिस्तानवर 19 टक्के, बांगलादेशवर 20 टक्के कर लादला होता. या यादीत आणखी अनेक देशांचा समावेश आहे, परंतु आता नवीन कर एका आठवड्यासाठी पुढे ढकलण्यात आला आहे. नवीन कर अमेरिकेला आर्थिक बळ देईल आणि व्यापार संतुलन देखील निर्माण करेल. या निर्णयामुळे अमेरिकेला आर्थिक सुरक्षा मिळेल आणि वर्षानुवर्षे सुरू असलेला व्यापारातील असमतोलही दूर होईल, असे  डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. 

इतर बातम्या
Join Whatsapp Group