भारतीय वस्तूंवर ५० टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. यामुळे भारताचं एकीकडे नुकसान होत आहे तर दुसरीकडे अमेरिकेत देखील महागाई वाढली आहे. अमेरिकेत अनेक जीवनावश्यक वस्तू महाग झाल्या आहेत, दुसरीकडे भारताच्या सी फूडला अमेरिकेत मोठी मागणी आहे, मात्र अमेरिकेनं लावलेल्या टॅरिफमुळे भारताच्या सी फूड इंड्रस्टीला मोठा फटका बसला आहे, मात्र आता एक मोठी गुडन्यूज समोर आली आहे.
अमेरिकेने लावलेल्या टॅरिफ भारताचं मोठं नुकसान होत होत. दरम्यान यासाठी रशियाने भारताला व्यापारासाठी बाजारपेठ खुली करत मोठी मदत केली. भारतीय कंपन्यांनी रशियामध्ये शिरकाव करताच पश्चिमेकडील देशांच्या कंपन्यांनी रशियातून काढता पाय घेतला आहे. याचा मोठा फायदा हा भारताच्या एमएसएमई (सूक्ष्म, लघू आणि मध्यम) उद्योगांना होणार आहे.
यामुळे भारतीय उद्योजकांना रशियामध्ये आपल्या वस्तू निर्यातीची फार मोठी संधी मिळाली आहे. रशियामध्ये भारतीय मालाची मागणी वाढत आहे. सध्याची परिस्थिती अशी आहे की, काही दिवसांमध्येच भारतीय कंपन्या रशियन बाजारपेठेचा संपूर्ण ताबा घेऊ शकतात. त्यामुळे अमेरिकेच्या टॅरिफमुळे झालेलं भारताचं नुकसान भरू निघणार आहे. टॅरिफच्या संकटातून भारत लवकरच बाहेर पडू शकतो.