एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांना अटक करण्यात आली आहे. आणि अक्षरश पृथीवरच्या नरकात पाठवल्याचं बोललं जात आहे. व्हेनेझुएलातून अमेरिकेत ड्रग्ज तस्करी केली जाते, असा आरोप अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सतत करत होते. त्यानंतर त्यांनी अमेरिकन सैनिकांना आदेश देत व्हेनेझुएलावर हल्ला करण्यास सांगितले. अमेरिकन सैनिकांनी नंतर हल्ला करून व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांना तसेच त्यांची पत्नी सिलिया प्लोरेस यांना अटक केली आहे. आता मादुरो यांच्यावर खटला उभारण्यात येणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार निकोलस मादुरो हे न्यूयॉर्कमधील ब्रुकलीन येथील एका तुरुंगात आहेत. या तुरुंगाला मेट्रोपॉलिटन डिटेंशन सेंटर (एमडीसी) असे म्हटले जाते. १९०० सालाच्या सुरुवातीला या तुरुंगाची उभारणी केली होती. सध्या या तुरुंगात साधारण १३००० कैदी बंद आहेत. या तुरुंगाला अनेकदा दुसरा नरक म्हणण्यात आले आहे. तसेच कैद्यांना इथे खूप त्रास दिला जातो, असा दावाही अनेक वकिलांनी आणि कैद्यांनी केलेला आहे.
या तुरुंगाती सोईसुविधा आणि तेथील एकंदरीत व्यवस्था फारच बिकट असल्याचे बोलले जाते. या तुरुंगाची स्थिती एवढी भयंकर आहे की काही न्यायाधीशांनी आरोपी आणि गुन्हेगारांना तेथे पाठवण्यास नकार दिला होता. २०२४ साली इथे दोन कैद्यांची हत्या करण्यात आली होती. तर काही तुरुंगाधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचेही आरोप आहेत. त्यामुळे आता मादुरो यांच्यासोबत काय होणार? असे विचारले जात आहे.