हट्टहास मोडीत ! डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं स्वप्न तुटलं
हट्टहास मोडीत ! डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं स्वप्न तुटलं
img
वैष्णवी सांगळे
शांततेचा नोबेल पुरस्कार मिळावा यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे गेल्या अनेक दिवसांपासून हट्टहास करत होते. मात्र त्यांचं हे स्वप्न भंगलंय.  व्हेनेझुएलामध्ये नोबेल पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावर्षी कोरिना मचाडो यांना शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं स्वप्न तुटलंय. 


शांततेचा पुरस्कार आपल्याला मिळावा यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी वारंवार दावा केला होता. जगातील सर्वात मोठं युद्ध आपण थांबवली आहेत. भारत-पाकिस्तानासह जगभरातील सात युद्ध थांबवल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता. त्यामुळे आपल्यालाच शांततेचा नोबेल मिळावा, असा हट्टहास त्यांनी धरला होता.

इतकेच नाही तर जगातील अनेक देशांच्या प्रमुख नेत्यांकडून त्यांनी आपली वा,वा करून घेतली होती. डोनाल्ड ट्रम्प कसे शांततेच्या नोबेलसाठी दावेदार आहेत, याची बतावणी करण्यास ट्रम्प यांनी त्यांना सांगितलं होतं. ट्रम्प यांना नोबेल मिळावं, यासाठी आठ देशांनी नामांकन केलं होतं. पाकिस्तान, इस्रायलसह अमेरिका, आर्मेनिया, अजरबैझान, माल्टा, कंबोडिया सारख्या देशानी ट्रम्प यांना नोबेल मिळावा यासाठी नामांकन केलं होतं.

यावर्षाचा शांततेचा पुरस्कार व्हेनेझुएलामध्ये लोकशाही हक्कांना प्रोत्साहन देण्यासाठी देण्यात आलाय. दरम्यान पुरस्कराची घोषणा करताना समितीकडून सांगण्यात आलंय की, आम्ही नेहमी शूर लोकांचा सन्मान केलाय. जे लोक नेहमीच दडपशाहीविरुद्ध उभे राहिलेत. स्वातंत्र्यासाठी लढत राहिलेत. गेल्या वर्षी माचाडो यांना स्वतःचे रक्षण करण्यासाठी लपून बसावे लागले होते, परंतु तरीही त्याने आपल्या देशातच राहणे पसंत केले, होतं असं समितीनं म्हटलंय.


इतर बातम्या
Join Whatsapp Group