आंतरराष्ट्रीय बाजारातून भारतासाठी मोठी बातमी समोर आली आहे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पुन्हा एकदा भारतानं मोठा दणका दिला आहे. भारतावर अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ लावून भारताची अर्थव्यवस्था कमजोर करण्याचा डोनाल्ड ट्रम्प याचा प्रयत्न सपशेल अयशस्वी ठरला आहे. भारताने हे सर्व अंदाज चुकीचे ठरवत डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा झटका दिला आहे.
भारत हा आता केवळ आशियाच नाही तर जगातील सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था बनला आहे. मोठी बातमी म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी लावलेल्या टॅरिफचा भारतावर नेमका काय परिणाम झाला? याची आकडेवारी आता समोर आली आहे. या आकडेवारीनुसार डोनाल्ड ट्रम्प यांनी लावलेल्या टॅरिफचा भारताच्या जीडीपीवर कोणताही परिणाम झालेला नाहीये, या उलट भारताची निर्यात कमी होण्याऐवजी वाढल्याचं पहायला मिळत आहे.
एएनआयच्या एका वृत्तानुसार आर्थिक वर्ष 2025- 26 मध्ये एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यांमध्ये भारताची निर्यात वाढून ती 220 बिलियन डॉलरवर पोहोचली आहे. त्यापूर्वीच्या आर्थिक वर्षात हा आकडा 214 बिलियन डॉलर होतो, याचाच अर्थ भारताची निर्यात 2.9 टक्क्यांनी वाढली आहे.
विशेष म्हणजे अमेरिकेसोबतची भारताची निर्यात तब्बल 13 टक्क्यांनी वाढली आहे. भारताची अमेरिकेसोबतच्या निर्यातीमध्ये 45 बिलियन डॉलरची वाढ झाली आहे, या रिपोर्टमध्ये असं देखील म्हटलं आहे की, अमेरिका ही भारतासाठी महत्त्वाची बाजारपेठ आहे.
तर एसबीआयच्या एका रिपोर्टनुसार जागतिक बाजारामध्ये भारताची निर्यात वाढली असून, निर्यातीमध्ये भारत जागतिक स्थानावर मजबूत स्थितीमध्ये पोहोचला आहे. सध्या जागतिक बाजारपेठेमध्ये प्रचंड चढ-उतार असताना देखील भारताची निर्यात वाढल्याचं पहायला मिळत आहे.