खासगी विमानाचा भीषण अपघात, दिग्गज खेळाडूसह संपूर्ण कुटुंबाचा मृत्यू
खासगी विमानाचा भीषण अपघात, दिग्गज खेळाडूसह संपूर्ण कुटुंबाचा मृत्यू
img
वैष्णवी सांगळे
रेसिंग जगतातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. अमेरिकेत झालेल्या विमान अपघाताने NASCAR समुदायाला मोठा धक्का बसला आहे. गुरुवारी सकाळी उत्तर कॅरोलिनातील स्टेट्सविले प्रादेशिक विमानतळाजवळ एक खाजगी विमान कोसळले, या भीषण अपघातात विमानातील सर्व सात जणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये निवृत्त NASCAR चालक ग्रेग बिफल, त्यांची पत्नी क्रिस्टीना आणि मुले रायडर (५) आणि एम्मा (१४) यांचा समावेश आहे. या अपघातामुळे संपूर्ण रेसिंग जगतात धक्का बसला आहे.

टेकऑफ केल्यानंतर परतण्याचा प्रयत्न करत असताना हे विमान जमिनीवर कोसळले आणि आगीचा भडका उडाला. त्यामध्ये अख्ख्या कुटुंबाचा अंत झाला. अपघाताच्या वेळी हवामान रिमझिम आणि ढगाळ होते. हे जेट ग्रेग बिफल यांच्या कंपनीकडे नोंदणीकृत होते. तथापि, अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या अपघातामुळे संपूर्ण रेसिंग जगतावर शोककळा पसरली आहे.

सेस्ना सी ५५० या खासगी विमानाने ग्रेग बिफल सकाळी १० वाजता स्टेट्सविले विमानतळावरून फ्लोरिडासाठी निघाले होते. विमानाने उड्डाण घेतले पण काही क्षणात पायलटला समस्या लक्षात आली. त्याने तात्काळ विमानतळावर परत येण्याचा प्रयत्न केला. पण पायलटचे नियंत्रण सुटले अन् विमान कोसळले. जोरात धडक झाल्यामुळे विमानाने पेट घेतला अन् आग भडकली. यामध्ये सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला. 

यावेळी विमानात ग्रेग बिफल (५५), पत्नी क्रिस्टीना आणि मुले रायडर आणि एम्मा तसेच डेनिस डटन आणि त्याचा मुलगा जॅक सोबतच बिफलचा जवळचा मित्र क्रेग वॅड्सवर्थ हे होते. दरम्यान, सेस्ना C550 हे जगभरात वापरले जाणारे एक लोकप्रिय मध्यम आकाराचे बिझनेस जेट होते.
इतर बातम्या
Join Whatsapp Group