डोनाल्ड ट्रम्प यांचं टेन्शन वाढलं! रशियाचं भारताला मोठं गिफ्ट
डोनाल्ड ट्रम्प यांचं टेन्शन वाढलं! रशियाचं भारताला मोठं गिफ्ट
img
वैष्णवी सांगळे
डोनाल्ड ट्रम्प यांचं टेन्शन वाढवणारी आणि भारताच्या आनंदात भर पाडणारी माहिती समोर आली आहे. भारताची चीन आणि रशियासोबत वाढत असलेली जवळीक अमेरिकेसाठी डोकेदुखीचा विषय ठरत आहे. दरम्यान आता रशियानं भारताला थेट सुपरजेट -100 आणि Il-114-300 सारख्या विमानांची ऑफर दिल्यानं अमेरिकेचा जळफळाट आता आणखी वाढण्याची शक्यता आहे.

रशियाने भारताला सुपरजेट -100 आणि Il-114-300 या दोन प्रवासी विमानाची ऑफर दिली आहे. हे दोन्ही विमानं रशियानं स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केली आहेत. एवढंच नाही तर या विमानावर रशियानं तिरंगी ध्वजाची प्रतिकृती देखील तयार केली आहे. ही विमानं भारताच्या विमान उद्योगाला चालना देऊ शकतात, असं देखील रशियानं म्हटलं आहे. दरम्यान भारत अजूनही विमानाच्या बाबतीमध्ये पाश्चिमात्य देशांवर अवलंबून आहे, मात्र जर भारतानं रशियासोबत या विमानांची डील केली तर भारत आणि रशियामधील व्यापारी संबंध आणखी मजबूत होण्यास मदत होणार आहे. 

एका रिपोर्टानुसार रशियाच्या उद्योग मंत्रालयाने युनायटेड इंजिन कॉर्पोरेशन द्वारे तयार करण्यात आलेल्या सुपरजेट 100 विमानच्या आतील भागाचे फुटेज शेअर केले आहेत, या विमानाच्या आतील भागामध्ये तिरंगी ध्वजाची प्रतिकृती साकरण्यात आली आहे, रशियाकडून या विमानाची भारताला ऑफर देण्यात आली आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group