कोलंबो येथे रंगलेल्या टी-२० विश्वचषकात भारत–पाकिस्तान सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानला तब्बल 61 धावांनी पराभूत करत एकतर्फी विजय मिळवला. दोन्ही संघामध्ये झालेल्या हायव्होल्टेज सामन्यात भारताने पाकिस्तानचा धुव्वा उडवला. इशान किशनच्या वादळी फलंदाजीनंतर गोलंदाजांनी भेदक मारा केल्यामुळे भारताने पाकिस्तानचा दारूण पराभव केला.
विश्वचषकात पाकिस्तानविरोधात हा ८ वा विजय आहे. टीम इंडियाच्या विजयानंतर भारतामध्ये जल्लोष जोरात सुरू होता. पण दुसरीकडे पाकिस्तानमध्ये मात्र टीव्ही फुटत होते. भारताकडून पराभव होताच पाकिस्तानच्या चाहत्यांचा राग अनावर झाला. पाकिस्तानच्या चाहत्यांनी पुन्हा एकदा टीव्ही फोडले. याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. या व्हिडिओवर नेटकरी मजेशीर कमेंट्स करत आहे.
भारताकडून मिळालेल्या पराभवानंतर पाकिस्तानी चाहत्यांमध्ये प्रचंड निराशा पाहायला मिळाली. सोशल मीडियावर एका चाहत्याचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. व्हिडिओत तो रागाच्या भरात आपल्या घरचा टीव्ही फोडताना दिसत आहे. "भारताने पुन्हा हरवलं, संतापून टीव्ही फोडला," अशी पोस्ट व्हिडिओवर लिहिली आहे. इतर अनेक चाहत्यांनीही आपण "शॉक आणि डिप्रेशन" मध्ये असल्याचे म्हटले आहे.