इराण आणि अमेरिका यांच्या युद्धाचा फटका इतर देशांना देखील बसत आहे. जगातील अनेक देशांवर तेलाचे आणि गॅसचे मोठे संकट ओढवले आहे. अनेक देशांमध्ये तेलाची मोठी टंचाई निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे. इराणने आखाती देशामधील तेल रिफायनरीवर हल्ला केला. इराणच्या तेल डेपोंना मोठी आग लागली. परिणामी तेलाची रिफायनरीच बंद झालीय. तेलाच्या वाढलेल्या किंमती आणि थांबलेली निर्यात यामुळे अनेक देशात परिस्थिती गंभीर आहे.
या युद्धामुळे पाकिस्तानमध्ये मोठा हाहाकार बघायला मिळतोय. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी देशाच्या तेलाचे संवर्धन करण्यासाठी अनेक कठोर उपाययोजनांची घोषणा केली. हेच नाही तर पाकिस्तानमध्ये तेलाचा इतका जास्त तुटवडा निर्माण झाला आहे की, त्यांनी धक्कादायक निर्णय घेत शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली. पुढील 2 आठवड्यांकरिता शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली. यासोबतच कर्मचाऱ्यांचे पगार २५ टक्के कापले जाणार आहेत.
तेल आणि वायूसाठी पाकिस्तान आखाती देशांवर अवलंबून आहे. पाकिस्तानमध्ये तेलाची आणि गॅसची अजिबात आयात होत नाहीये. सरकारकडून पेट्रोलच्या किंमती जवळपास 20 टक्क्यांनी वाढवल्या. पाकिस्तानच्या सरकारने आता शाळा दोन आठवड्यांसाठी बंद ठेवण्याचा मोठा निर्णय घेतला.
पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी या निर्णयाला कठीण म्हटले आहे. पुढील किंमती टाळण्याकरिता या उपायोजना करत असल्याचे त्यांनी म्हटले. ऊर्जा संकट आता एक नवीन संकट बनले आहे. यासोबतच काही ऑफिसला वर्क फ्रॉम होम देखील जाहीर करण्याचा निर्णय पाकिस्तान सरकारकडून घेण्यात आला. पाकिस्तानमध्ये परिस्थिती अधिक बिकड बनता दिसत आहे. तेलाचा साठा पाकिस्तानचा जवळपास संपला असल्याचेही सांगितले जात आहे.