दैनिक भ्रमर : पाकिस्तनसाठी दहशतवाद नवीन नाही. पाकिस्तानच्या पाळलेल्या या दहशतवादीवादी पिल्लांमुळे अनेक देशांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. येथील लष्कराकडूनच दहशतवादी पोसले जात असल्याने पाकिस्तानच्या अनेक नागरिकांना भीतीच्या वातावरणात जगावे लागत आहे. पण आता याचा त्रास आता पाकिस्तानात नागरिकांना देखील होत आहे. पाकिस्तानी लष्कराने पुन्हा एकदा खैबर पख्तूनख्वा प्रांताला रणांगण बनवले आहे.
बाजौर जिल्ह्यातील लोई मामुंड आणि वार मामुंड तहसीलमध्ये तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) विरुद्ध मोठ्या प्रमाणावर लष्करी कारवाई सुरू झाली आहे. या ऑपरेशनमुळे ५५ हजारांहून अधिक नागरिकांनी घर सोडले असून, सुमारे ४ लाख लोक कठोर कर्फ्यूमुळे घरातच अडकले आहेत. अलीकडेच तालिबान कमांडर्ससोबत झालेल्या शांतता चर्चेला अपयश आले आणि त्यानंतर २९ जुलै रोजी “ऑपरेशन सरबकाफ” पुन्हा सुरू करण्यात आले.
चर्चेद्वारे दहशतवाद्यांना अफगाणिस्तानात पाठविण्याचा प्रयत्न झाला होता; परंतु सलग अनेक फेऱ्या निष्फळ ठरल्यानंतर लष्कराने पुन्हा आक्रमक पवित्रा घेतला. या कारवाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने २७ संवेदनशील भागांमध्ये १२ ते ७२ तासांचा कर्फ्यू लागू केला आहे. परिणामी हजारो कुटुंबांचा अन्न, पाणी आणि औषधांच्या टंचाईचा सामना होत आहे