ऑपरेशन सिंदूरनंतर मसूद अझहरचे अख्ये खानदान मारले गेले, जैशच्या कमांडरचा मोठा कबूलनामा
ऑपरेशन सिंदूरनंतर मसूद अझहरचे अख्ये खानदान मारले गेले, जैशच्या कमांडरचा मोठा कबूलनामा
img
वैष्णवी सांगळे
पहलगाम हल्ल्यानंतर भारतात पाकिस्तानविरोधी मोठा संताप व्यक्त करण्यात आला होता. पहलगाम हल्ल्याचे सडेतोड उत्तर पाकिस्तानला दयावे अशी  मागणी  जोर धरत होती. त्यानंतर पाकिस्तानातील दहशतवाद्यांविरोधात ऑपरेशन सिंदूर राबवले गेले. ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानी दहशदवादी मोठ्या संख्येने मारले गेल्याच भारत सरकारकडून स्पष्ट करण्यात आले होते. 

मोठी बातमी : मंत्रिमंडळ बैठकीत ८ धडाकेबाज निर्णय

भारतीय लष्कराच्या हल्ल्यानंतर जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहरचे अख्ये खानदान मारले गेले अशी कबुली पाकिस्तानची दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदच्या कमांडर मसूद इलियास कश्मीरी याने सुरक्षा यंत्रणांसमोर दिली आहे. त्याने मान्य केले आहे की, ७ मे २०२५ मध्ये भारताने केलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहरचे पूर्ण कुटुंब मारले गेले.

सुप्रीम कोर्टाचे ज्येष्ठ वकील सिद्धार्थ शिंदेंना कोर्टात आली भोवळ, उपचारादरम्यान मृत्यू

आता हा धक्कादायक आणि खळबळउडवणारा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय. बहावलपूरमध्ये झालेल्या हल्ल्यात मसूद अजझरच्या घरातील सदस्यांचे जीव गेले. मसूद इलियास कश्मीरी व्हिडीओमध्ये स्पष्टपणे म्हणत आहे की, भारतीय लष्कराने 7 मे 2025 ला बहालपूर येथील दहशतवादी अड्ड्यावर हमला केला. त्यावेळी मसूद अझहरचे संपूर्ण कुटुंब त्याचठिकाणी होते. 


इतर बातम्या
Join Whatsapp Group