जर्मनीच्या दोन वेळच्या ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या 31 वर्षांच्या लॉरा डाहलमीयरचा पाकिस्तानमधील काराकोरम पर्वतरांगांमध्ये गिर्यारोहण करताना दुर्दैवी मृत्यू झाला. ही दुर्घटना सुमारे 18,700 फूट उंचीवर घडली. लैला पीक या अत्यंत अवघड समजल्या जाणाऱ्या शिखरावर चढाई करत असताना, डाहलमीयर माउंटन स्लाइड अर्थात डोंगरातील खचलेल्या भागाचा भूस्खलनच्या झपाट्यात ती आली आणि दुर्दैवी मृत्यू झाला .
लॉरा डाहलमीयर हिने 2018 च्या प्योंगचांग हिवाळी ऑलिम्पिकमध्ये एक स्प्रिंट आणि दुसरं परस्यूट प्रकारात अशी दोन सुवर्णपदकं जिंकली होती. या शिवाय, तिने इंडिव्हिज्युअल इव्हेंटमध्ये कांस्य पदकही पटकावलं होतं.लॉरा डाहलमीयर ही एक अनुभवी पर्वतारोहक होती. ती जूनच्या शेवटीपासून उत्तर पाकिस्तानात होती आणि ग्रेट ट्रांगो टॉवर सारख्या कठीण शिखरावर आधीच चढाई पूर्ण केली होती. मात्र, लैला पीक हे एक अत्यंत धोकादायक आणि कठीण समजले जाणारे शिखर आहे, जिथे आजवर फक्त सातच गिर्यारोहक यशस्वी चढाई करू शकले आहेत.