खळबळजनक ! १८ ते २० हल्लेखोरांचा बसवर अंदाधुंद गोळीबार, १८ पुरूष प्रवाशांचं अपहरण
खळबळजनक ! १८ ते २० हल्लेखोरांचा बसवर अंदाधुंद गोळीबार, १८ पुरूष प्रवाशांचं अपहरण
img
वैष्णवी सांगळे
पाकिस्तानमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पाकिस्तानमधील सिंध प्रांतात १८ ते २० अज्ञात बंदूकधारी हल्लेखोरांनी एका प्रवासी बसवर बेछूट गोळीबार केला आणि नंतर बसमधील १८ पुरुष प्रवाशांचं अपहरण केलं.

मिळालेल्या माहितीनुसार, सिंध प्रांतातील घोटाकी परिसरात हे ओलीसनाट्य घडलं. अज्ञात हल्लेखोरांनी सिंध आणि पंजाब सीमेजवळ हायवे लिंक रोडवर रात्रीच्या सुमारास एका प्रवासी बसवर अंदाधुंद गोळीबार केला. गोळीबारात बस चालक आणि काही प्रवासी जखमी झाल्याचे वृत्त आहे. तर बसमधील १८ पुरुष प्रवाशांचं अपहरण देखील केलं.

माता न तू वैरिणी ! शौचालयात बाळाला जन्म, कमोडमध्ये अर्भकाला टाकून फ्लश

स्थानिक मीडिया रिपोर्सनुसार , बसमधून प्रवास करणाऱ्या एका महिलेनेच सगळा घटनाक्रम सांगितला. जवळपास १८ ते २० हल्लेखोर होते. सर्वांकडे बंदुका होत्या. सर्वांनी चेहरे स्कार्फने झाकलेले होते. हल्लेखोरांनी सर्व पुरूष प्रवाशांना बसमधून उतरायला सांगितले. पण बसमधील इतर महिला प्रवाशांना कोणतीही इजा पोहोचवली नाही. शस्त्रधारी हल्लेखोर त्या सर्व पुरूष प्रवाशांना घेऊन गेले, अशी माहिती प्रत्यक्षदर्शी महिलेनं दिली.

अपहरण झाल्यानंतर सिंधच्या गृहमंत्र्यांचे प्रवक्ता जिया उल हसन लांझर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ही घटना खूपच दुःखद आहे. चालक आणि वाहका व्यतिरिक्त बसमध्ये जवळपास ३० प्रवासी होते. पोलिसांनी या अपहरणाच्या घटनेची चौकशी सुरू केली आहे, असेही त्यांनी सांगितले.
इतर बातम्या
Join Whatsapp Group