माता न तू वैरिणी ! शौचालयात बाळाला जन्म, कमोडमध्ये अर्भकाला टाकून फ्लश
माता न तू वैरिणी ! शौचालयात बाळाला जन्म, कमोडमध्ये अर्भकाला टाकून फ्लश
img
वैष्णवी सांगळे
आपल्या लेकरासाठी साऱ्या जगाशी लढणारी ती आई असते. पण कलियुग काय असते त्याची हळूहळू आता जणू प्रचिती यायला लागली आहे. मध्यप्रदेश मध्ये घडलेली घटना संतापजनक अन मानवतेला काळिमा फासणारीच आहे.  मध्य प्रदेशच्या छिंदवाडा जिल्ह्यातील परासिया येथे संतापजनक घटना समोर आली आहे. रुग्णालयाच्या शौचालयात एका महिलेने बाळाला जन्म दिला. त्यानंतर तिने स्त्री अर्भकाला कमोडमध्ये टाकले आणि अर्भक जावे म्हणून फ्लश देखील केले. त्यानंतर ती तेथून पसार झाली.  

रुग्णालयातील एक महिला कर्मचारी शौचालय स्वच्छ करण्यासाठी गेल्यावर ही घटना उघडकीस आली. या महिलेने शौचायल साफ करत असताना फ्लश केला. पण पाणी काही गेले नाही. कमोडमध्ये काही तरी अडकल्यासारखे तिला वाटले. त्यामुळे तिने वाकून पाहिले. तर आतमध्ये नवजात बाळाचे हात आणि डोकं दिसून आले. हे पाहून घाबरलेल्या महिलेने ताबडतोब रुग्णालय व्यवस्थापनाला कळवले.

घटनेची माहिती वाऱ्यासारखी रुग्णालयात पसरली आणि एकच खळबळ उडाली. रुग्णालय व्यवस्थापनाने ताबडतोब एएनसी, पीएनसी आणि प्रसूती कक्षांची तपासणी केली. पण नुकताच बाळंतपणाशिवाय प्रसूती झालेल्या कोणत्याही महिला आढळल्या नाहीत. त्यानंतर पोलिसांना कळवण्यात आले.महानगरपालिका कर्मचारी, रुग्णालय कर्मचारी आणि पोलिसांनी शौचालय तोडले. अर्भकाचा मृतदेह कमोडमध्ये खोलवर अडकला होता आणि तो बाहेर काढण्यासाठी रात्री ८ वाजेपर्यंत वेळ लागला.

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की, गर्भवती महिला बाह्यरुग्ण विभागात तपासणीसाठी रुग्णालयात आली असावी. तिने प्रसाधनगृहात बाळाला जन्म दिला आणि पुरावे लपवण्यासाठी नवजात अर्भकाला कमोडमध्ये टाकून फ्लश करण्याचा प्रयत्न केला. मुलगी जन्माला आली म्हणून महिला किंवा तिच्या कुटुंबातील सदस्याने हे पाऊल उचलले असावे असा संशय पोलिसांनी व्यक्त केवा. पोलिस सध्या रुग्णालय आणि परिसरातील सीसीटीव्ही तपासत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group