भीषण अपघात : लग्नावरून परत येताना कारने दुचाकीला उडवले, नवरा-बायकोसह चिमुकलीचा मृत्यू
भीषण अपघात : लग्नावरून परत येताना कारने दुचाकीला उडवले, नवरा-बायकोसह चिमुकलीचा मृत्यू
img
Dipali Ghadwaje
मध्यप्रदेशातील बोनकट्टा येथून विवाह समारंभ आटोपून एका दुचाकीवरून गावाकडं परतत असताना भरधाव आलेल्या कारने दुचाकीला जोरात धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीवरील पती - पत्नीसह त्यांच्यासोबत असलेली शेजाऱ्यांची पाच वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार , ही घटना सोमवारी मध्यरात्री भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी ते पाथरी मार्गावर घडली. हे तिघेही दुचाकीनं चिखला मॉईल इथं जात होते, त्यावेळी काळाने घाला घातला. कैलास मरकाम (४२), पार्वता मरकाम (३६),यामिनी कंगाली (०५) यांचा मृतकात समावेश आहे.

या प्रकरणाचा गोबरवाही पोलीस अधिक तपास करीत आहे. तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी बोनकट्टा राज्य मार्गावर पाथरी फाट्याजवळ समोरून येणाऱ्या अज्ञात कारने दुचाकी चालकाला समोरून धडक दिल्याने भीषण अपघात झाला.

या भीषण अपघातामुळे तीन जणांचा मृत्यू झाला. यामध्ये नवरा-बायको आणि चिमुकलीचा समावेश आहे. तीन जणांचा जागीच मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

अपघातानंतर कारचालक घटनास्थळी वरून पसार झाला. पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे. फिर्यादी विजय सोमा कंगाली यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.  
इतर बातम्या
Join Whatsapp Group