पतीला सोडलं,  बॉयफ्रेंडसोबत पळाली, धोका मिळताच पतीकडे परत आली, नंतर मात्र असं काही घडलं की सर्वानाच धक्का बसला
पतीला सोडलं, बॉयफ्रेंडसोबत पळाली, धोका मिळताच पतीकडे परत आली, नंतर मात्र असं काही घडलं की सर्वानाच धक्का बसला
img
वैष्णवी सांगळे
मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये एक आश्यर्यदायक घटना घडली आहे. एका महिलेने आधी पतीला धोका दिला, नंतर मात्र स्वतः धोक्याची शिकार झाली. विवाहित महिलेने प्रेमीसाठी पतीला सोडले. पळून जाताना घरातून २ लाख रुपये रोख आणि सर्व दागिने घेऊन ती पसार झाली. त्यानंतर प्रेमीने तिला तीन वेगवेगळ्या ठिकाणी भाड्याच्या घरात ठेवले. नंतर जेव्हा सर्व पैसे संपले, तेव्हा तो तिच्याकडूनच पैशाची मागणी करू लागला.  मी पैसे कुठून आणू, असे महिलेने सांगितल्यानंतर तो तिला मारहाण करू लागला. शेवटी प्रेमीने तिला एका ट्रेनमध्ये बसवले आणि स्वतः कुठेतरी पळून गेला. 

बॉयफ्रेंडने फसवल्यानंतर महिला हतबल झाली होती. तिला काय करावे सुचत नव्हते. शेवटी ती महिला पुन्हा पतीकडे परत आली. रडत-रडत महिलेने पतीला संपूर्ण कहाणी सांगितली. त्यानंतर पतीने जे काही केले ते ऐकून सर्वजण चकीत झाले. पत्नीची परिस्थिती पाहता पतीने तिची साथ दिला. नंतर दोघे पोलीस ठाण्यात गेले आणि आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली. सध्या, महिलेने केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

महिलेने पोलिसांना सांगितले की, एका तरुणाने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. जेव्हा जेव्हा तिचा पती घराबाहेर असायचा, तेव्हा तो भेटायला घरी यायचा. दोघांमध्ये संबंध निर्माण झाले. नंतर तरुणाने सांगितले की तो तिच्याशी लग्न करू इच्छितो. महिला म्हणाली, मी त्याच्या बोलण्यात आले होते. मी पतीचा विचार केला नाही. पीडितेच्या म्हणण्यानुसार, आरोपी तिला जळत्या सिगारेटने शरीरावर चटके द्यायचा.

महिलेने सांगितले की, आरोपीने तिला पीथमपूर, इंदूर आणि सीहोरमध्ये वेगवेगळ्या भाड्याच्या खोल्यांमध्ये ठेवले. या काळात त्याने अनेक वेळा तिचे शारीरिक शोषण केले आणि तिचे पैसे व दागिने खाणे-पिणे आणि खोल्यांचे भाडे देण्यात उडवले. पीडितेने सांगितले की, जेव्हा सर्व पैसे संपले आणि दागिने विकले गेले, तेव्हा तो आणखी पैशांची मागणी करू लागला. जेव्हा तिने सांगितले की आता पैसे कुठून आणणार, तेव्हा तिला मारहाण करू लागला.

आरोपीने तिला केवळ निर्दयी मारहाणच केली नाही, तर शरीरावर जळत्या सिगारेटने अनेक चटकेही दिले. मग एक दिवशी इंदूरवरुन येणाऱ्या ट्रेनमध्ये बसवून तो निघून गेला. महिलेने सांगितले की, पतीकडे परत येऊन तिने संपूर्ण घटनाक्रम सांगितला आणि नंतर पोलिसांची मदत घेतली. सध्या, पोलिस आरोपीच्या शोधात आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group