सुंदर डोळ्यांच्या मोनालिसाचे महाकुंभातील फोटो व्हायरल , आता थेट बॉलिवूडमधून....?
सुंदर डोळ्यांच्या मोनालिसाचे महाकुंभातील फोटो व्हायरल , आता थेट बॉलिवूडमधून....?
img
Dipali Ghadwaje
सोशल मीडियावर सध्या एका मुलीच्या सौंदर्याची खूप चर्चा होत आहे. ती  मध्य प्रदेशातून कुंभमेळ्यात हार विकण्यासाठी आली आहे, तिचं नाव आहे मोनालिसा .निळ्या डोळ्यांच्या मोनालिसाचे फोटो आणि व्हिडीओ सध्या तूफान व्हायरल झाले आहेत. तिच्याबद्दल आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे.

 मध्य प्रदेशातील इंदूर येथून प्रयागराज येथील कुंभमेळ्यात माळा विकणारी मोनालिसा सोशल मीडियावर खूप व्हायरल झाली आहे. तिचे निळे डोळे आणि साधेपणामुळे लोक तिला 'मोनालिसा' म्हणू लागले.ती सोशल मीडियावर बरीच व्हायरल झाली आहे. तिचे घारे डोळे आणि चेहेरेपट्टी पाहून अनेक जण तिची तुलना ऐश्वर्या राय सोबत करताना दिसतात. पण तिला सोनाक्षी सिन्हा जास्त आवडते. 

मोनालिसाच्या सौंदर्याने आणि आकर्षक व्यक्तिमत्त्वाने कुंभमेळ्यात आलेल्या लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. मोनालिसा कधी शाळेत गेलेली नाही, ती कुंभमेळ्यात माळा विकण्याचं काम करते. पण तिचं नशीब लवकरच बदलणार आहे, कारण बॉलिवूड दिग्दर्शक सनोज मिश्रा हे तिची भेट घेणार आहेत.
 
एका वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार ,  चित्रपट निर्माते सनोज मिश्राने मोनालिसाला त्याच्या आगामी चित्रपटात मुख्य भूमिकेची ऑफर देणार आहेत. चित्रपटाचे नाव "डायरी ऑफ मणिपूर" असे सांगितले जात आहे, ज्यामध्ये मोनालिसाची मुख्य भूमिका साकारण्यासाठी निवड केली जाऊ शकते.
 
मोनालिसाला अभिनयाचा अनुभव नाही, पण तिला अभिनयाचे संपूर्ण प्रशिक्षण दिले जाईल, असे चित्रपट निर्मात्याने सांगितले आहे. अभिनयाच्या दुनियेत पाऊल ठेवण्याची ही संधी मोनालिसासाठी एखाद्या स्वप्नापेक्षा कमी नाही. ही ऑफर प्रत्यक्षात आल्यास मोनालिसाच्या बॉलिवूड करिअरला नवी दिशा मिळू शकते.  
 
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group