नव्या आयुष्याची सुरुवात करण्याआधी लग्नाच्या मंडपात सगळं संपलं, एक क्षणात होत्याचं नव्हतं झालं. नवा संसार सुरू होण्याआधीच शोककळा पसरली. लग्नाच्या सोहळ्यात सात फेरे घेताना नवरदेवाचा जागीच मृत्यू झाला. नवरदेवाच्या अकाली मृत्यूमुळे लग्नाच्या आनंदाच्या वातावरणात शोककळा पसरली.
लग्नाचे काही विधी पूर्ण झाले होते, उरलेले विधी सुरू असताना नवरदेव अचानक कोसळला. नक्की काय घडलं हे समजेना, सगळेजण नवरदेवाला उठवत होते, शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत होते. मात्र त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे दोन्ही कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला.
सात फेरे घेत असताना नवरदेवाला अचानक छातीत कळ आली आणि तो बेशुद्ध झाला. त्याला शुद्धीवर आणण्यासाठी कुटुंबियांनी आटापीटा केला, मात्र त्याचा उपयोग झाला नाही. नवरदेवाला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केलं. हृदयविकाराच्या झटक्याने नवरदेवाचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला.
मृत नवरदेवाचे नाव हर्षित असून, लग्नासाठी मोठ्या उत्साहात तयारी करण्यात आली होती. बँडबाजा, घोडागाडी अशा थाटात वरात काढण्यात आली होती. मध्यरात्रीपर्यंत नाच-गाणी आणि फोटोसेशन सुरू होते. सकाळी सहा वाजता सात फेरांचे विधी सुरू असतानाच हर्षित कोसळला.
नवरदेवाचे स्वतःचे मेडिकल स्टोअर होते, आणि त्याच्यावर कुटुंबाची मोठी जबाबदारी होती. ही धक्कादायक घटना मध्य प्रदेातील सागर इथे घडली आहे. 7 जन्म सोबत राहण्याचं वचन घेत असताना 7 सेकंदात सगळं संपल्याने कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला. या घटनेने नववधूचे आयुष्य अक्षरशः उद्ध्वस्त झालं असून, लग्नाच्या आनंदाचा क्षण दु:खात बदलला. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोक व्यक्त करण्यात आला.