राज्याचे क्रीडामंत्री अॅड. माणिकराव कोकाटे यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या कडील सर्व खाते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कडे सोपवण्यात आले आहेत.
कोकाटे यांना नाशिकच्या कनिष्ठ न्यायालयाने बनावट दस्तावेज व फसवणुकीप्रकरणी फेब्रुवारी महिन्यात ठोठावलेली दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायालयाने काल कायम ठेवली होती.
दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडून क्रीडा खाते काढून घेतल्याचे पत्र राज्यपालांकडे दिले आहे.