नाशिक :- येथील काँग्रेस तसेच विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश सोहळा संपन्न झाला.
उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्यनेते ना. एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिक येथील उबाठा गटाच्या पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश सोहळा संपन्न झाला.
उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर, विकासाभिमुख कार्यपद्धतीवर व जनतेशी असलेल्या थेट संवादाने प्रभावित होऊन नाशिक येथील राहुल दिवे, सौ. आशा तडवी, सौ. पूजा नवले, प्रविण नवले, अनिल जोंधळे, सुनील बोराडे आदी पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
ह्याप्रसंगी शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे व सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ यांची प्रमुख उपस्थिती होती.
या वेळी शिवसेना सचिव सुषांत शेलार, विजय करंजकर, प्रविण तिदमे यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.