सातपूरच्या माधव डोअर या प्लायवूड दुकानाला भीषण आग
सातपूरच्या माधव डोअर या प्लायवूड दुकानाला भीषण आग
img
दैनिक भ्रमर

सातपूर -केवल पार्क हिंदुस्तान बेकरी परिसरात असलेल्या माधव डोअर या प्लायवूड दुकानाला  भीषण आग लागल्याची घटना घडली असून या  आगीत  अंदाजे सहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
     
   पराग वल्लभभाई कलारिया यांचे केवल पार्क परिसरात फर्निचरचे दोन दुकाने आहेत. शुक्रवार ( दि.२३ ) रोजी सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान माधव डोअर्स या  दुकानाला अचानक आग लागली. आग भीषण  असल्याने काही वेळातच दुकानातील प्लायवूड, , फर्निचर साहित्य आगीत जळून खाक झाले.या घटनेची माहिती मिळताच सातपूर अग्निशमन विभाग देण्यात आली.

अंबड एमआयडीसी अग्निशमन विभागाचा एक बंब व सातपूर अग्निशमन विभागाचा एक बंबाच्या मदतीने अग्निशमन कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्न करून  आग पूर्णपणे विझवण्यात आली.आग लागल्याची घटना समजताच परिसरात एकच खळबळ उडाली होती. नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. आग वेळीच आटोक्यात आल्यामुळे शेजारील इतर दुकाने व परिसरातील मोठे नुकसान टळले.

 आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे केंद्रप्रमुख एस आर पगार एस एस  एस तुपलोंढे हर्षल परदेशी स्वप्नील चव्हाण ऋषिकेश पवार हर्षल कुलकर्णी कौशल्य माळेकर आदींनी परिश्रम घेतले
इतर बातम्या
Join Whatsapp Group