नूडल्स खाणाऱ्यांनो सावधान नूडल्सच्या पाकीटमध्ये मेलेली पाल आढळल्याचा धक्कादायक प्रकार अहिल्यानगर शहरात एक उघडकीस आलाय. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, याबाबत निलेश दिवे यांनी अहिल्यानगरच्या अन्न औषध प्रशासन विभागाच्या सहाय्यक आयुक्तांना लेखी तक्रार दिली असून पालीचे पिल्लू मिळालेले नूडल्सचे पाकीट प्रशासनाच्या स्वाधीन केले आहे.
नेमकं काय घडलं?
निलेश दिवे यांनी अहिल्यानगर शहरातील डी मार्ट या मॉलमधून नूडल्सचे दोन पाकीट खरेदी केले होते. त्यापैकी एका पाकिटामधील नूडल्स त्यांनी बनवायला घेतलं.
नूडल्सचे पाकिट उघडल्यानंतर त्यामध्ये त्यांना काही तरी काळपट पदार्थ असल्याचे दिसून आले. त्यांनी हा नेमका पदार्थ काय आहे हे तपासण्यासाठी ताटामध्ये नूडल्स टाकले तर त्यांना पालीचे मेलेले पिल्लू असल्याचे लक्षात आले.
नूडल्समध्ये मेलेली पालपाहून निलेश दिवे यांना धक्का बसला. त्यांनी तात्काळ याबाबत सर्व पुरावान्याशी अन्न औषध प्रशासनाकडे लेखी तक्रार केली.
याबाबत त्यांनी डी मार्ट कंपनीकडे तसेच नूडल्स बनवणाऱ्या कंपनीकडे ई-मेलद्वारे कळवले आहे. पुढील कारवाई लवकरच करण्यात येईल अशी माहिती अन्न औषध प्रशासनाचे अन्नसुरक्षा अधिकारी राजेश बडे यांनी दिली आहे.