मोठी बातमी :
मोठी बातमी :
img
Dipali Ghadwaje
आत्ताच एक मोठी बातमी समोर आली आहे. पश्चिम बंगालमधील बांकुरा आणि पूर्व वर्धमान जिल्ह्यात वीज कोसळून 13 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, वादळात जिल्ह्यात वेगवेगळ्या भागात वीज कोसळून आठ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती बांकुरा पोलीस अधीक्षक वैभव तिवारी यांनी दिली आहे. तसेच ओंडा येथे चार जणांचा मृत्यू झाला, तर कोतुलपूर, जॉयपूर, पत्रासैर आणि इंदास पोलिस स्टेशन परिसरात प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला असल्याची माहिती देखील त्यांनी दिली.

तर पूर्व वर्धमान जिल्ह्यात वीज कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला आणि चार जण जखमी झाले असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्याने दिले आहे.

माधबदीही येथे दोन जणांचा मृत्यू झाला, तर जिल्ह्यातील औसग्राम, मंगलकोट आणि रैना पोलिस स्टेशन परिसरात प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला असं त्यांनी सांगितले. तसेच जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत अशी माहिती देखील त्यांनी दिली.

बांकुरा येथील ओंडा येथे भातशेतीत काम करताना नारायण सार (48), जबा बौरी (38), तिलोका मल (49) यांचा मृत्यू झाला, तर आणखी एका व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही.

जिल्ह्यात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये कोतुलपूर येथील झियाउल हक मोल्ला (50), पत्रासायर येथील जीवन घोष (20), इंदास येथील इस्माईल मंडल (60) आणि जॉयपूर येथील उत्तम भुनिया (38) यांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group