पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे राजकारणात आली , अन् २४व्या वर्षीच खुशाली बनली....; वाचा संपूर्ण बातमी
पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे राजकारणात आली , अन् २४व्या वर्षीच खुशाली बनली....; वाचा संपूर्ण बातमी
img
Dipali Ghadwaje
देशातील अधिकाधिक तरुणाईने राजकारणात यावे, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून सातत्याने तरूणाईला आवाहन केले जाते. अशीच एक तरूणी मोदींच्या कामामुळे प्रभावित होऊन राजकारणात आली अन् 24 व्या वर्षीच सरपंचही झाली आहे. एवढेच नाही तर त्यासाठी तिने परदेशात जाऊन नोकरी करण्याची संधीही दवडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार ,  खुशालीबेन रबारी असे या तरुणीचे नाव आहे. गुजरातमधील मेहसाणा जिल्ह्यातील वीसनगर तालुक्यातील कुडा या गावाच्या सरपंचपदाची माळ तिच्या गळ्यात पडली आहे. खुशाली आता सरपंच खुशालीबेन झाल्या आहेत. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत त्या 1320 मतांनी विजयी झाल्या आहेत.

खुशाली यांच्या आयुष्यामध्ये आलेल्या सर्वात मोठ्या ट्विस्टमागे पंतप्रधान मोदी कारणीभूत आहेत. याबाबत खुशाली यांनी सांगितले की, मी नर्सिंगच्या अंतिम वर्षाचे शिक्षण घेत आहे. नर्सिंगनंतर परदेशात जाऊन नोकरी करण्याच्या अनेक संधी असतात. पण मोदीसाहेबांचे काम पाहिले आणि तेव्हापासून राजकारणात आवड निर्माण होऊ लागली. लोकांच्या आशिर्वादामुळे आता गावाची सेवा करण्याची संधी मिळाली आहे.

मोठा योगायोग 

खुशालीबेन या पंतप्रधान मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना 2003 मध्ये सुरू केलेल्या शाळा प्रवेशोत्सव-कन्या केळवणी महोत्सव कार्यक्रमाच्या साक्षीदार आहेत. त्या 2006 मध्ये याच कार्यक्रमांतर्गत गावातील प्राथमिक शाळेत दाखल झाल्या होत्या. आता शुक्रवारी याच कार्यक्रमांतर्गत त्यांनी सरपंच म्हणून मुलांना शाळेत प्रवेश दिला.

पंतप्रधान मोदी हे आपले प्रेरणास्थान असल्याचे सांगताना खुशालीबेन म्हणाल्या, गांधीनगर तसेच अहमदाबाद मधील अनेक कार्यक्रमांमध्ये पंतप्रधान मोदींना प्रत्यक्ष पाहिले होते. त्यांच्या नेतृत्वापासून प्रेरणा मिळत राहते. त्यांच्यामुळे मलाही नेतृत्व करण्याची आवड निर्माण झाली. आता गावातील रस्ते व विकासाच्या इतर कामांना प्राधान्य देत लोकांची सेवा करण्याची इच्छा आहे, असे खुशालीबेन यांनी सांगितले.

खुशालीबेन यांच्या कुटुंबात आई-वडिलांसह दोन लहान भाऊ आहेत. त्यांना कुठलाही राजकीय वारसा नसताना निवडणुकीत यश मिळाले आहे. गुजरातमध्ये 22 जून रोजी 8 हजार 326 ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले होते. त्याचा निकाल 26 जूनला लागला. यामध्ये खुशालीबेन मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group