मनोरंजन विश्वात काम करताना अनेकदा अभिनेत्रींना कास्टिंग काऊचसारख्या प्रकारांना सामोरं जावं लागतं. त्यामुळे अभिनेत्रींना खूपदा मनस्ताप सहन करावा लागतोबॉलीवूड विश्वातून आजपर्यंत अनेक अभिनेत्रींनी त्यांना कास्टिंग काउचचे अनेक धक्कादायक अनुभव उघड केलेलं आहेत. अनेक वेळोवेळी हे धक्क्कादायक प्रकार समोर आलेले आहेत. दरम्यान, आता पुन्हा एकदा एका प्रसिद्ध अभिनेत्रीने तिला आलेला विचित्र आणि घाणेरडा अनुभव सांगितला आहे.

प्रसिद्ध अभिनेत्री सुरवीन चावला ‘क्रिमिनल जस्टीस सीझन 4’ या शोमुळे बोलबाला आहे. पण एका मुलाखतीत तिने तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील अस्वस्थ करणारे अनुभव शेअर करत कास्टिंग काउचच्या प्रकारांवर थेट प्रहार केला आहे.तसेच, भारतीय मनोरंजन विश्वाच्या काळ्या बाजूंवर प्रकाश टाकत धक्कादायक खुलासे केले आहेत.
‘द मेल फेमिनिस्ट’ या प्लॅटफॉर्मला दिलेल्या मुलाखतीत सुरवीन म्हणाली, मी मुंबईच्या वीरा देसाई रोडवरील एका ऑफिसमध्ये एका दिग्दर्शकासोबत मीटिंगसाठी गेले होते. मी त्या वेळी आधीच लग्न केले होते. मीटिंगनंतर ते मला गेटपर्यंत सोडायला आले आणि अचानक माझ्या दिशेने झुकून मला किस करण्याचा प्रयत्न केला. मी त्यांना मागे ढकललं आणि त्यांना विचारलं, तुम्ही काय करताय? आणि मी तिथून निघून गेले. मी अक्षरश: हादरले होते."
सुरवीनने आणखी एक प्रसंग उलगडला. जिथे तिला एका दक्षिणात्य चित्रपटाच्या दिग्दर्शकाने शूटिंगच्या वेळी त्याच्यासोबत ‘झोपण्याची’ अट घातली होती. तो दिग्दर्शक हिंदी किंवा इंग्रजी बोलू शकत नव्हता. म्हणून त्याने एका मित्राला ट्रान्सलेटर म्हणून आणलं. त्याच्या मित्रामार्फत त्याने मला सांगितलं की शूटिंग दरम्यान त्याच्यासोबत झोपणं गरजेचं आहे, असं तिने सांगितलं.
यापूर्वी आरजे सिद्धार्थ कन्नन यांना दिलेल्या मुलाखतीतही सुरवीनने सांगितलं होतं की ऑडिशनच्या वेळी तिला साउथ इंडियन सिनेमासाठी खूप जाडी आहे, असं म्हणून तिची खिल्ली उडवण्यात आली होती. तिने सांगितलं, या इंडस्ट्रीत महिलांना त्यांच्या लुक्सवरून फार चुकीच्या प्रकारे जज केलं जातं.