वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात मोठी घडामोड; वाचा सविस्तर
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात मोठी घडामोड; वाचा सविस्तर
img
नंदिनी मोरे
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पदाधिकारी राजेंद्र हगवणे हिने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली होती परंतु त्यानंतर आता वैष्णवीचा शवविच्छेदनाचा अहवाल समोर आला असून त्यात वैष्णवीच्या शरीरावर जखमा असून या जखमांमुळेच तिचा मृत्यू झाला असल्याचं या अहवालात म्हंटलं असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, आता या प्रकरणात आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे. वैष्णवी हगवणेचे वडील अनिल कसपटे यांनी पोलिसांमध्ये दिलेल्या तक्रारीत नमूद केलेली फॉरच्युनर कार आता बावधन पोलिसांकडून जप्त करण्यात आलेली आहे.


पुण्यातील वैष्णवी हगवणे हिने शशांक हगवणे याच्याशी प्रेमविवाह केलेला होता.  वैष्णवीच्या वडिलांनी मुलीच्या लग्नात कोट्यवधीचा हुंडा दिला होता. 51 तोळे सोनं, 7.5 कोळीचे चांदीचे भांडे आणि फॉरच्युनर कार हुंड्यात देण्यात आली होती. मात्र तरीही हुंड्यासाठी वैष्णवीचा छळ होत होता, असा आरोप कुटुंबाकडून करण्यात आला आहे. यासंपूर्ण प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे. त्यानंतर आता बावधन पोलिसांनी कसपटे यांनी हुंड्यात दिलेली फॉरच्युनर कार जप्त केलेली आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group