लडाखच्या गलवानमधील चारबाग भागात एक मोठी दुर्घटना घडली आहे. सैन्याच्या एका वाहनावर दगड कोसळला.
यात वाहनाच नुकसान झालय. सोबत दोन अधिकारी शहीद झाले. तीन अधिकारी गंभीररित्या जखमी झालेत. जखमींना एअरलिफ्ट करण्यात आलय.
मिळालेल्या माहितीनुसार , जखमींमध्ये 2 मेजर आणि एक कॅप्टन आहे. जवानांचा ताफा दुरबुकपासून चोंगटासच्या ट्रेनिंग प्रवासावर होते. बुधवारी सकाळी 11.30 च्या सुमारास हा अपघात झाला.
दुरबुकवरुन चोंगताशला जाणाऱ्या सैन्य वाहनाला भूस्खलनाचा सामना करावा लागला. यात 14 सिंध हॉर्सचे लेफ्टनेंट कर्नल मनकोटिया, दलजीत सिंह शहीद झाले. मेजर मयंक शुभम (14 सिंध हॉर्स), मेजर अमित दीक्षित आणि कॅप्टन गौरव (60 आर्म्ड) जखमी झाले.
जखमी जवानांना 153 GH लेह येथे नेण्यात आलं आहे. या दुर्घटनेबद्दल भारतीय सैन्याच्या फायर एंड फ्यूरी कॉर्प्सने माहिती दिलीय. 30 जुलै रोजी सकाळी 11.30 च्या सुमारास लडाख येथे सैन्याच्या वाहनावर पर्वतावरुन आलेला मोठा दगड कोसळला. बचाव कार्य सुरु आहे.